हनीट्रॅप ! अश्लील चित्रफितीच्या आधारे खंडणीसाठी वाळूतस्कराची फॉर्च्युनर

जखणगावातील एका महिलेने अश्‍लील चित्रफीत तयार करून त्याआधारे एका व्यावसायिकास एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
Hunny Trap.jpg
Hunny Trap.jpg

नगर : अश्‍लील चित्रफितीच्या आधारे खंडणी उकळणाऱ्या जखणगावच्या प्रकरणात वाळूव्यावसायिक बापू सोनवणे (Bapu Sonavane) (रा. हिंगणगाव, ता. नगर) यास नगर तालुका पोलिसांनी अटक केली. या वाळूव्यावसायिकाचे फॉर्च्युनर वाहनही हस्तगत करण्यात आले आहे. (Honeytrap! Sandstone Fortune for ransom based on pornographic videos)

जखणगावातील एका महिलेने अश्‍लील चित्रफीत तयार करून त्याआधारे एका व्यावसायिकास एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या महिलेविरुद्ध दाखल असलेल्या पहिल्यात गुन्ह्यात आरोपी अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) व खंडणीखोर महिलेला अटक केली होती.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये हिंगणगावमधील वाळूव्यावसायिक बापू सोनवणे याच्या फॉर्च्युनर वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला हिंगणगावातील राहत्या घरातून गुरुवारी (ता. 20) अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्यात वापरलेले फॉर्च्युनर वाहनही जप्त करण्यात आले आहे. 

या महिलेची व तिचा साथीदार अमोल मोरे या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आणखी चार दिवसांची (ता. 24) पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. 

हेही वाचा..

नेवाशात 42 हजार हेक्‍टरवर होणार खरीप पेरण्या 

नेवासे : तालुक्‍यात "लॉकडाउन'च्या काळात शेतकरी शेतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामातील पेरण्यांसाठी सज्ज झाले आहेत. तालुका कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी 42 हजार 200 हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, बाजरी व तूर या पिकांवर नियोजनात भर राहणार आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, मका क्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, बाजरी तुरीकडे अधिक कल वाढला आहे. 

तालुक्‍यात एकूण एक लाख 29 हजार 200 हेक्‍टर क्षेत्र असून, लागवड व पेरणीयोग्य क्षेत्र एक लाख 11 हजार 333 हेक्‍टर आहे. यापैकी सर्वांत जास्त 21 हजार 800 हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते, तर त्याखालोखाल सहा हजार 252 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन, सहा हजार 217 हेक्‍टर क्षेत्रावर बाजरी, तर उर्वरित क्षेत्रावर मका व तूर यांसारख्या पिकांची पेरणी केली जाते. 

तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र एक लाख 29 हजार 200 हेक्‍टर असले, तरी पीक लागवडीलायक क्षेत्र एक लाख 11 हजार 333 हेक्‍टर आहे. त्यापैकी 54 हजार 179 हेक्‍टर क्षेत्र खरिपासाठी योग्य आहे. यंदा पडीक जमीन वगळता 42 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे. उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना, तसेच मोहीम राबविली जाणार आहे. 

कृषी विभागाची खरीप तयारी पूर्ण 

या वर्षी मॉन्सून वेळेवर येण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने, येथील कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, कपाशीच्या 21 हजार 800 हेक्‍टर क्षेत्रासाठी हेक्‍टरी चार, याप्रमाणे एकूण 87 हजार 200 पाकिटे बियाणे लागण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे. 
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com