नगरमध्ये हनी ट्रॅप ! "त्या' महिलेविरोधात आणखी एक गुन्हा - Honey trap in town! "Another crime against that woman | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये हनी ट्रॅप ! "त्या' महिलेविरोधात आणखी एक गुन्हा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

जखणगावातील या महिलेने एक मे रोजी एका व्यक्‍तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याची अश्‍लील चित्रफीत काढली.

नगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्‍लील चित्रफीत काढणाऱ्या, जखणगावातील "त्या' महिलेच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेला आणखी तीन जण मदत करीत होते. त्यांच्याविरोधातही खंडणी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जखणगावातील या महिलेने एक मे रोजी एका व्यक्‍तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याची अश्‍लील चित्रफीत काढली. चाकूचा धाक दाखवून त्याला मारहाण केली, तसेच चित्रफितीच्या आधारे शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी संबंधित व्यक्‍तीने चारचाकी वाहनाच्या डिकीत असलेले 30 हजार रुपये दिले. 50 हजार रुपये या महिलेने वेगवेगळ्या नातेवाइकांच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने भरण्यास भाग पाडले. 

या महिलेविरुद्ध यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला. या चक्रव्यूहात अडकलेल्या व्यक्ती आता फिर्याद द्यायला पुढे येत आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 18) एका पीडित व्यक्‍तीने दिलेल्या फिर्यादीवरून या महिलेसह तिच्या अन्य चार साथीदारांविरुद्ध खंडणी, जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या महिलेसाठी तिचे साथीदार एजंट, तसेच चित्रफीत तयार करणे, संबंधित व्यक्‍तीला मारहाण करणे, पैसे लुटणे, अशी कामे करीत होते. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप तपास करीत आहेत. 

दोन साथीदार पसार 

या महिलेचा हमीदपूर (ता. नगर) येथील साथीदार सचिन भीमराज खेसे याला अटक करण्यात आली आहे. अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) याला पहिल्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. नालेगावातील रहिवासी असलेले महेश बागले व सागर खरमाळे हे दोघे पसार आहेत. 

दरम्यान, हे प्रकरण महाराष्ट्रात चर्चिले जात आहे.

 

हेही वाचा...

कुकडेची आवर्तन 20 मे पासून

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख