राम शिंदेंनी कोरोनाग्रस्तांसाठी आतापर्यंत काय केले? - Gulab Tanpure criticizes former minister Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

राम शिंदेंनी कोरोनाग्रस्तांसाठी आतापर्यंत काय केले?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 मे 2021

आमदार पवार हे गेली वर्षभरापासून मतदारसंघातील जनतेच्या सोयीसाठी अविरतपणे काम करत आहेत.

मिरजगाव : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी करत असलेल्या मदत कार्यावर टीका करणाऱ्या माजी मंत्री राम शिंदेंनी (Ram Shinde) मतदार संघातील कोरोना ग्रस्तांसाठी काय केले? असा सवाल मिरजगाव जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब तनपुरे यांनी केला आहे. (Gulab Tanpure criticizes former minister Ram Shinde)

शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कोरोना काळातील कार्यपद्धतीवर टीका केली होती. 'सरकारनामा'शी बोलताना तनपुरे म्हणाले,"आमदार पवार हे गेली वर्षभरापासून मतदारसंघातील जनतेच्या सोयीसाठी अविरतपणे काम करत आहेत. मतदार संघात हजारांच्यावर खाटा असणारे अत्याधुनिक कोविड सेंटर त्यांच्याच प्रयत्नातून उभा राहिले आहेत. अनेकांना कोरोना काळात इंजेक्शन व औषधे मिळण्यासाठी वेगवेगळया माध्यमातून प्रयत्न केले.

हे ही वाचा : मोठा निर्णय; मराठा आरक्षणप्रकरणी केंद्राची फेरयाचिका

अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त कोविड सेंटर आणि कोरोना प्रतिबंधासाठी राबवीत असलेली प्रभावी नियंत्रणा यांच्या जोरावरच तालुक्यातील कोरोना (Korona) रुग्ण संख्या आता नियंत्रणात आली आहे. हे सर्व करत असतानाच विकास कामांना गती देण्याच काम देखील सातत्याने सुरु आहे.'सीना'च्या माध्यमातून मिरजगाव परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न पवार यांनी कायमचा सोडविला आहे. 

हे ही वाचा : कोरोना लसीसाठी राजेश टोप यांनी मोदींना सुचविला हा फॅार्म्यूला

परिसरातील सीना कालव्याच्या निर्मितीपासून कधीही न झालेले दुरुस्तीचे काम आमदारांच्या पुढाकारातून करण्यात आले. कुकडीच्या पाण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संकटाच्या या काळात राजकारण करत असलेले शिंदे यांनी कोरोना काळात सामान्य जनतेसाठी सामाजिक भावनेतून आतापर्यंत काय केले? दहा वर्षे सत्ता भोगली असताना मतदार संघातील सामान्य नागरिकांसाठी एखादे कोविड सेंटर उभारले का? सद्य स्थितीत कार्यान्वित असणाऱ्या कोविड रुग्णालयांना कुठली मदत उपलब्ध करून दिली आहे? फक्त विरोधासाठी विरोध न करता शिंदे यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला तनपुरे यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख