पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात, तीन मंत्री काय करतात, आमदार विखे यांची टीका - Guardian ministers come as guests, what do three ministers do, criticizes MLA Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात, तीन मंत्री काय करतात, आमदार विखे यांची टीका

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यावर फक्त केंद्र सरकारवर टिका करण्याचे काम दिले आहे. अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राकारांशी बोलताना उपस्थित केला.

शिर्डी : जिल्ह्यात कोविड रूग्णांचे वाढते मृत्यू आणि संख्येला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पालकमंत्री हे पाहुण्यासारखे येतात. जिल्ह्यातले तिन मंत्री काय करतात ते जनतेला कळत नाही. रूग्ण बेडसाठी वणवण भटकतात. रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यावर फक्त केंद्र सरकारवर टिका करण्याचे काम दिले आहे. अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राकारांशी बोलताना उपस्थित केला.

ते म्हणाले, की ब्रेन द चेनमध्ये प्रशासन मग्न आहे. त्यांना रूग्णांचे हाल दिसत नाहीत. मंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखविण्‍यापेक्षा रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची उपलब्‍धता त्वरीत करायला हवी. प्रत्‍येक मंत्र्याला आपल्‍या मतदार संघात, जिल्‍ह्यात 200 बेडचे कोव्‍हीड रुग्‍णालय उभारायला सांगायला हवे. केवळ फेसबुकवर संवाद साधुन जनतेचे समाधान होणार नाही हे लक्षात घ्या. 

केंद्र सरकारने राज्‍याला मोठ्या प्रमाणात केविड लसिचा पुरवठा केला. त्यामुळेच देशात सर्वाधिक लसिकरण महाराष्ट्रात झाले. याचा सोयीस्कर विसर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना झाला. राज्यातील मंत्रअपयश झाकण्‍यासाठ कोविड लसपुरवठ्याला राजकीय वळण देत आहेत. 
 

हेही वाचा...

748 जणावर कोविडचे उपचार सुरू

संगमनेर : कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर स्थानिक प्रशासनाने शासकीय व 28 खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने 969 रुग्णांवर उपचारांची व्यवस्था केली आहे.

त्याअंतर्गत 150 खाटांच्या अतिदक्षता विभागासह 332 ऑक्सिजन, 38 व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या व 228 सामान्य खाटाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सध्या या सर्व ठिकाणी मिळून 748 रुग्ण उपचार घेत असून, 138 जणांना कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर संगमनेरात 221 खाटा शिल्लक आहेत. आसपासच्या अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व राहाता तालुक्यातील सुमारे 25 रुग्ण संगमनेरात उपचार घेत आहेत. याशिवाय लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी तालुक्यातील 14 ठिकाणी व्यवस्था केली असून, सद्यस्थितीत तेथील साडेसातशे खाटा शिल्लक आहेत.

कोवीडची सुरवात संगमनेरात मागील वर्षीच्या मार्च महिन्यात झाली. त्या वेळी उभारलेल्या पायाभूत सुविधांचा सध्या लाभ मिळत आहे. रुग्णांसह आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोबल टिकून रहावे, यासाठी संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम तालुक्यातील चौदा विलगीकरण कक्षांसह, 29 ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेटी देवून प्रत्यक्ष बाधित रुग्ण आणि आरोग्य सेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

स्थानिक प्रशासनातील अशा काही अधिकार्‍यांनी गेल्या वर्षभर अगदी समर्पित भावनेतून काम केल्याने इतक्या मोठ्या संक्रमणानंतरही संगमनेरातील आरोग्य सुविधा अद्यापही पूर्णतः नियंत्रणात आहेत.
 

 

Edited By-  Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख