गोपीनाथ मुंडे यांना उपपंतप्रधान व्हायचे होते, हे कामख्या देवीने ऐकलेच नाही - Gopinath Munde wanted to be the Deputy Prime Minister, but Kamakhya Devi never heard of it | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीनाथ मुंडे यांना उपपंतप्रधान व्हायचे होते, हे कामख्या देवीने ऐकलेच नाही

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 4 जून 2021

मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावरील खास टपाल कव्हरचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.

नगर : लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या आठवणीत राहिलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना उपपंतप्रधान व्हायचे होते. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने ही इच्छा अपूर्ण राहिली. ते सध्या असते, तर कदाचित या पदावर असते. त्यानिमित्ताने `आई` व `मावशी`ची (बीड व नगर जिल्हा) मान उंचावली असती. (Gopinath Munde wanted to be the Deputy Prime Minister, but Kamakhya Devi never heard of it)

मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावरील खास टपाल कव्हरचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. या व्हर्च्युअल कार्यक्रमात महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रज्ञा मुंडे, मुंडे यांच्या कन्या पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी सहभागी झाले होते. 

या वेळी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्याशी मुंडे यांचा झालेला एक संवाद सांगितला. ते म्हणाले, की 2014 च्या निवडणुकीआधी आम्ही आसामच्या दौरयावर गेलो होतो. तेथे कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यावर मी मुंडे यांना विचारले, की तुम्ही देवीकडे काय माहितले, तेव्हा ते म्हणाले की नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करावे व मला उपपंतप्रधान करावे, हेच मागणे मी देवीकडे मागितले. ही आठवण सांगताना प्रसाद त्या आठवणीत रमून गेले होते.

खासदार डाॅ. प्रीतम मुंडे या लोकसभेत अभ्यापूर्ण मुद्दे मांडतात व पित्याचा वारसा त्या पुडे नेत आहेत, अशा शब्दांत त्यांनी डाॅ. प्रीतम मुंडे यांचे काैतुक केले.

दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे असते, तर ते कदाचित उपपंतप्रधान असते. अशा परिस्थितीत त्यांनी आई म्हणजे बीड जिल्हा आणि मावशी म्हणजे नगर जिल्ह्याला भरभरून निधी आणला असता. मुंडे प्रत्येक भाषणातून बीड व नगर जिल्ह्याचा उल्लेख करताना आई व मावशी असा करायचे. नगर जिल्हा ही माझी मावशी आहे. तिचे मला कायमच आशीर्वाद असतात, असे ते म्हणायचे. त्यामुळेच त्यांचे नगर जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. हाच धागा पकडून त्यांच्या कन्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनीही नगर जिल्ह्यावर तितकेच प्रेम केले. आमदार मोनिका राजळे यांना निवडून आणण्यात मुंडे यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे नगर जिल्ह्यानेही मुंडे परिवाराला कधी दूर केले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असताना आमदार राजळे यांनी मी राजीनामा देते, तुम्ही माझ्या मतदारसंघातून आमदार व्हा, असे सांगितले होते. त्यावरून मुंडे यांच्याशी असलेले प्रेम दिसून येते.

 

हेही वाचा..

सरळ साधेपणाने वागणे, हीच मुंडे यांना श्रद्धांजली

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख