साईसंस्थानच्या अध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांना संधी द्या, कोणी घातले शरद पवारांना साकडे - Give a chance to Pratap Dhakne as the president of Sai Sansthan, to Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

साईसंस्थानच्या अध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांना संधी द्या, कोणी घातले शरद पवारांना साकडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

ढाकणे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोचविण्याचे काम केले.

पाथर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांची नियुक्ती करण्याची मागणी पाथर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. (Give a chance to Pratap Dhakne as the president of Sai Sansthan, to Sharad Pawar)

पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, उद्योजक किरण शेटे, बंडू बोरुडे, सभापती बन्सीभाऊ आठरे, उपसभापती मंगल गर्जे, गहिनीनाथ शिरसाट, योगेश रासने, बाळासाहेब घुले, वैभव दहिफळे, माधुरी आंधळे, रफिक शेख, सीमा चितळे आदींनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून तशी मागणी केली आहे.

ढाकणे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसांपर्यंत पोचविण्याचे काम केले. अनेक वर्षांपासून ते संघर्ष करीत आहेत. ढाकणेंची साईसंस्थानच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केल्यास विकासाला चालना मिळेल, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

हेही वाचा..

सुरळीत वीजपुरवठ्याबाबत ऊर्जामंत्री तनपुरे यांना साकडे

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील अळकुटी, शेरी कासारे, गारखिंडी, पाडळी आळेसह अन्य गावांतील विजेचा पुरवठा विस्कळित होतो. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वाढीव रोहित्र मिळाल्यास पुरवठा सुरळीत होईल. याबाबत आपण लक्ष घालावे, असे निवेदन ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना सभापती काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली या गावांतील सरपंचांनी दिले.

याबाबत ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली. वाढीव रोहित्राबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. अळकुटी, शेरी कासारे, गारखिंडी, पाडळी आळे या गावांमध्ये विस्कळित वीजपुरवठा होत असल्याने जोमात आलेल्या शेतीपिकांचे नुकसान होत आहे. अळकुटीतील वीज उपकेंद्रावरही अतिरिक्त भार झाल्याने रोहित्रे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. गावठाणातही वीज टिकत नाही. बँकेचे कामकाज विस्कळित होते.

शेतीपंप रोहित्रांअभावी पंधरा दिवस बंद राहतात. याबाबत ऊर्जामंत्री तनपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. सरपंच डॉ. कोमल भंडारी, ए. बी. उजागरे, निवृत्ती चौधरी, राहुल गाडगे, स्वाती मुळे, अलका थोरात, बाळासाहेब धोत्रे, किरण शिंदे, भरतरी काणे आदी सरपंच उपस्थित होते.

 

हेही वाचा..

नद्या जोड प्रकल्पात राजकारण नको

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख