राष्ट्रवादीप्रणीत सरकार घालवा अन्‌ "कुकडी'चे पाणी मिळवा, राम शिंदे यांचा अजेंडा

"कुकडी'च्या पाण्यातील गोंधळाबाबत शिंदे म्हणाले, ""पाणी व शेतीबाबत कळवळा दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण घेतले आहे.
Ram shinde.jpg
Ram shinde.jpg

श्रीगोंदे : "महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर सुरू आहे. कुकडी डाव्या कालव्याचे वाटोळे याच राष्ट्रवादीने केल्याचा इतिहास आहे. ज्या वेळी भाजपचे सरकार आले, त्यावेळी "कुकडी'च्या कामांना गती मिळाली. आताही डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानचा बोगदा आमच्या सरकारच्या मंजुरीनंतरही होत नाही. राष्ट्रवादीला नगरच्या "कुकडी'खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे,'' असा आरोप करीत माजी पालकमंत्री राम शिंदे (Ram shinde) यांनी, आगामी काळात यांना हटवून भाजप सत्तेवर आले तरच "कुकडी'चे पाणी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. (Get rid of the NCP-led government and get water from "Kukdi", Ram Shinde's agenda)

"कुकडी'च्या पाण्यातील गोंधळाबाबत शिंदे म्हणाले, ""पाणी व शेतीबाबत कळवळा दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण घेतले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. "कुकडी'च्या डाव्या कालव्याचे उन्हाळ्यातील आवर्तन पावसाळ्यात सुरू केले, यावरूनच त्यांचे पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्‍यांबाबतचे "प्रेम' दिसते. या तालुक्‍यांतील फुललेली शेती उजाड करण्याचा आघाडी सरकारचा डाव आहे.'' 

डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानचा बोगदा भाजप सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, ""कुकडी डाव्या कालव्याचा इतिहास तपासून पहा. युतीच्या सरकारने "कुकडी'चे पाणी श्रीगोंदे, कर्जत करमाळा तालुक्‍यांत आणले. त्यानंतर राष्ट्रवादीप्रणीत सरकार आले. 2014 पर्यंत काहीच प्रगती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुधारित प्रकल्पाला मान्यता मिळताना जवळपास चार हजार कोटींची मंजुरी दिली. त्यानंतर 216 कोटींच्या डिंभे माणिकडोह बोगद्याला मान्यता दिली. हे सगळे आपण पालकमंत्री असताना झाल्याचा आनंद असला, तरी त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हे सगळे गुंडाळून ठेवले आहे. पुणेकर असलेले सगळेच राष्ट्रवादीचे नेते, आमदार, मंत्री यांना नगर व सोलापूर तालुक्‍यांतील शेतकरी उद्‌ध्वस्त करायचा आहे.'' 

महाविकास आघाडी सरकारची "कुकडी'बाबत नियत ठीक नाही 

भाजपचे सरकार व आपण पालकमंत्री होतो त्यावेळी "कुकडी'ची बैठक कधी, हे सांगण्याची गरज भासली नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करण्याचीही वेळ येऊ दिली नाही. आता मात्र पावसाळ्यात उन्हाळ्याचे आवर्तन करणाऱ्या सरकारची नियत ठीक नाही नसल्याचे दिसून येते. "कुकडी'खालील शेतकऱ्यांनी या सरकारकडून अपेक्षा ठेवणे आता बंद करून, भाजप सरकार पुन्हा आणावे व हक्काचे पाणी संघर्ष न करता घ्यावे. 
- राम शिंदे, माजी मंत्री 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com