वडाळ्यात रेमडेसिव्हिर विकणारी टोळी जेरबंद  - A gang selling remedivir in Wadala was arrested | Politics Marathi News - Sarkarnama

वडाळ्यात रेमडेसिव्हिर विकणारी टोळी जेरबंद 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

इंजेक्‍शन घेवून पाच जण आले असता पथकाने छापा घालून चौघांना अटक केली. त्यातील एक जण फरार झाला. यावेळी पोलिसांनी सहा रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, एक चारचाकी, मोटारसायकल व मोबाईल जप्त केले.

सोनई : वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथे रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्‍शन काळ्याबाजारात विकणाऱ्या चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. यातील एक आरोपी फरार झाला. आरोपींकडून सहा इंजेक्‍शनसह 11 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज (ता. 9) सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. (A gang selling remedivir in Wadala was arrested)

काही व्यक्ती वडाळाबहिरोबा येथील हॉटेल समधान समोर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन विक्री करणार असल्याची माहिती नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल परिसरात सापळा रचला. इंजेक्‍शन घेवून पाच जण आले असता पथकाने छापा घालून चौघांना अटक केली. त्यातील एक जण फरार झाला. यावेळी पोलिसांनी सहा रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, एक चारचाकी, मोटारसायकल व मोबाईल जप्त केले. 

हेही वाचा...

कृषी शिक्षणासाठी नवीन धोरण

रामहरी बाळासाहेब घोडेचोर (रा. देवसडे, ता. नेवासे), आनंद पुंजाराम थोटे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (रा. देवटाकळी, ता. शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (रा. खरवंडी, ता. नेवासे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आज (ता. नऊ) अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा...

कोविड सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड वाढवणार ः डॉ. बोरुडे 

नगर : नगर शहरातील कोविड सेंटर व खासगी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती घेऊन कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये 20 ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केले. 
नगर शहरातील विविध कोविड सेंटरला मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे, सदस्य निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बोरुडे म्हणाले, लवकरच आरोग्य विभाग व प्रशासनाशी बैठक घेऊन आरोग्यसेवेच्या उपाययोजना केल्या जातील. आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आरोग्य समितीच्या मार्फत कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 
 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख