शहरातील टीम शिवसेनेला गडाखांची साथ : महापौर शेंडगेंना विश्वास - Gadkhas support Shiv Sena in the city: Trust Mayor Shendge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

शहरातील टीम शिवसेनेला गडाखांची साथ : महापौर शेंडगेंना विश्वास

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कोरोना काळात मदत व आधार देण्याचे काम नगर शहरातील  माझ्या सर्व शिवसैनिकांनी फत्ते केले.संभाव्य लाटेतही अशीच भुमिका असूद्या मी सदैव पाठीशी आहेच.

सोनई : नगर शहराची शिवसेनेबरोबर (Shivsena) नाळ जुळलेली आहे. महापौर पदाचे प्रत्येक पाऊल विकास कामासाठीच असणार आहे. टीम शिवसेनेला मिळालेली जलसंधारमंत्री शंकरराव गडाख यांची साथ नक्कीच सार्थकी लावली जाईल, असा विश्वास महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला. (Gadkhas support Shiv Sena in the city: Trust Mayor Shendge)

मुळा शैक्षणिक संस्थेच्या विश्रामगृह येथे नगर शहर येथील  शिवसंपर्क अभियान उदघाटन प्रसंगी सत्कारास उत्तर देताना महापौर शेंडगे यांनी गडाखांचे आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, महापौर रोहिणी शेंडगे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेना नेते संभाजी कदम, भगवान फुलसौंदर,विक्रम राठोड, अनिल शिंदे सर्व नगरसेवक, इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

गडाख म्हणाले, की "मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कोरोना काळात मदत व आधार देण्याचे काम नगर शहरातील  माझ्या सर्व शिवसैनिकांनी फत्ते केले.संभाव्य लाटेतही अशीच भुमिका असूद्या मी सदैव पाठीशी आहेच."

कोराना संसर्गाच्या स्थितीत नगर शहरावर मोठे संकट आले होते. मात्र सर्वच शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता आपुलकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला, असे सांगून मंत्री गडाख यांनी ही भुमिका शिवसेना पक्षास भुषणावह ठरली. यापुढेही प्रत्येक संकटात पुढे राहत माणुसकीचा धर्म पाळणे. काहीही अडचण असेल, तर मी सदैव पाठिशी आहेच. असा विश्वास दिला. मुख्यमंत्री व पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचून पक्षवाढीस प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

युवकांनी स्वतःचे प्लॅन तयार ठेवावेत

नगर : युवकांनी करियर निवडताना स्वतःचे प्लॅन तयार ठेवावेत म्हणजे अपयश येत नाही. युवकांनी स्वतःमध्ये असलेले गुण ओळखले पाहिजे. स्वतः मध्ये असणाऱ्या कमतरता भरून काढून त्यातून सामर्थ निर्माण केले पाहिज. व्यसनापासून दूर राहून व्यासंगी कसे होता येईल, हे पाहिले तर प्रत्येक युवकाला आयुष्यात यशस्वी होता येईल, असे प्रतिपादन सध्या आसाम राज्यातील कोकराझार येथे पोलीस अधीक्षक पदावरती कार्यरत असलेले आयपीएस इंजिनियर प्रतिक ठुबे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने झूम मीटिंग द्वारे आयोजित केलेल्या युवक आणि करियर या विषयावर ते बोलत होते. त्यांनी आपल्या संपूर्ण व्याख्यानात अनेक विषयांना स्पर्श केला.

 

हेही वाचा..

खासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख