निळवंडे कालव्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयंत पाटील - Funds for Nilwande canals will not be reduced: Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

निळवंडे कालव्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयंत पाटील

आनंद गायकवाड
शनिवार, 22 मे 2021

2022च्या मध्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन लाभक्षेत्राला पाणी देण्याचा प्रयत्न आहे.

संगमनेर : "उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सातत्याने पाठपुरावा असतो. कितीही अडचणी आल्या, तरी निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाला राज्य सरकारची प्रायॉरिटी आहे. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. 2022च्या मध्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन लाभक्षेत्राला पाणी देण्याचा प्रयत्न आहे,'' असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. 

जवळे कडलग (ता. संगमनेर) येथील आढळा सेतू पुलाच्या कामाची पाहणी करताना ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, सीताराम गायकर, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ, संतोष हासे, अजय फटांगरे, कपिल पवार, मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ""उत्तर नगर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसाठी निळवंडे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळातच या धरणाच्या कामाला गती मिळून ते काम पूर्ण झाले. मागील पाच वर्षांत काम थांबले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी 491 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करीत कामाला गती दिली आहे. या कामासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कोरोनाचे संकट असले तरी निळवंडे कालव्यांच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही.'' 
महसूलमंत्री थोरात म्हणाले, ""निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण यासाठी सातत्याने काम करीत आहोत. लाभक्षेत्राला कालव्याचे पाणी मिळणे हा आपल्या आयुष्यातील मोठा आनंदाचा क्षण असेल.'' 

पुलाची स्ट्रक्‍चरल कामे, माती व खोदकामे, जमीन अधिग्रहण या सर्व कामांची माहिती घेऊन सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला यावेळी मंत्रिमहोदयांनी दिल्या. 

हेही वाचा..

खतांच्या किमतीबाबत दिलासा

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख