"म्युकरमायकोसिस'वर मोफत उपचाराची योजना कागदावरच - Free treatment plan for "mucomycosis" on paper | Politics Marathi News - Sarkarnama

"म्युकरमायकोसिस'वर मोफत उपचाराची योजना कागदावरच

वसंत सानप
शुक्रवार, 14 मे 2021

दोन्ही रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असून, उपचारावर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. जामखेड तालुक्‍यातील पिंपरखेड व खर्डा येथील दोन तरुण या आजारावर उपचार घेत आहेत.

जामखेड : "म्युकरमायकोसिस' या आजाराचा समावेश महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली. अद्याप तालुका प्रशासनास हे आदेश न मिळाल्याने येथील दोन रुग्णांना महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून या रुग्णांवर मोफत उपचारासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. (Free treatment plan for "mucomycosis" on paper)

कोरोनाचा रुग्णाला म्युकरमायकोसिस या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारावरील उपचार महागडे असल्याने आरोग्यमंत्री टोपे यांनी तीन दिवसांपूर्वी या आजाराचा समावेश महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या आजारावर मोफत उपचार मिळणार, हे निश्‍चित झाले. मात्र या निर्णया संदर्भातील आदेश अद्याप तालुकास्तरावर प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील दोघे या योजनेपासून वंचित आहेत. 

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

हे दोन्ही रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असून, उपचारावर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. जामखेड तालुक्‍यातील पिंपरखेड व खर्डा येथील दोन तरुण या आजारावर उपचार घेत आहेत. दोन्ही रुग्णांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून, उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्‍न त्यांच्या नातेवाईकांसमोर आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

तत्काळ रुग्णालयांची यादी जाहीर करावी 

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी कान, नाक, घसा, नेत्र, मेंदू विकारतज्ज्ञाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राज्यातील ठराविक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच उपचार होऊ शकतात. त्यामुळे शासनाने तातडीने परिपत्रक काढून जिल्हानिहाय रुग्णालयांची नावे प्रसिद्ध करावेत. त्यामुळे रुग्णांना तत्काळ मोफत उपचार मिळू शकतील. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख