डॉक्‍टरसह पाच जणांवर गुन्हा, बिल मागितल्याने डांबले होते कोविड सेंटरमध्ये

नगर शहरातील पॅसिफिक केअर सेंटर हॉस्पिटलमध्ये मेहुणे भागवत सुपेकर यांना 5 मे रोजी कोरोनावरील उपचारासाठी दाखल केले होते.
 Crime.jpg
Crime.jpg

जामखेड : रुग्णाच्या शेजारी ठेवलेले मृतदेह तत्काळ हलवावेत, तसेच लिखित बिल द्यावे, अशी मागणी केल्याने नगर (Nagar) येथील "पॅसिफिक केअर सेंटर'मधील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद आकाश भागवत डोके (रा. जामखेड) यांनी जामखेड पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी नगर येथील डॉक्‍टरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Five people, including a doctor, were charged at the Covid Center for asking for a bill) 

फिर्यादीत म्हटले आहे, की नगर शहरातील पॅसिफिक केअर सेंटर हॉस्पिटलमध्ये मेहुणे भागवत सुपेकर यांना 5 मे रोजी कोरोनावरील उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर ते खूप घाबरलेले दिसले. त्यांच्या आजूबाजूला 3 ते 4 मृतदेह अनेक तासांपासून ठेवण्यात आले होते. ते हलविण्याची विनंती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना आम्ही केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. 

हेही वाचा..

रविवारी (ता. 9) सुपेकर यांचा मृत्यू झाला. नंतर हॉस्पिटलने दोन लाख 65 हजार रुपये बिलापोटी भरण्यास सांगितले. त्यावेळी आपण रीतसर बिल मागितले. त्यावरून डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बाळकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. त्यांनी आपणास मारहाण केली, तसेच कोविड सेंटरमधील रूममध्ये डांबून ठेवले. डॉ. जाधव यांनीही लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर सुपेकर यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
दरम्यान, रविवारी (ता. 9) रात्री उशिरा डॉ. प्रशांत जाधव यांच्या तक्रारीवरून नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात आकाश डोकेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा..

कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र ट्रकचालकांना सक्‍तीचे 

नगर : परराज्यांतून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना कोरोना निगेटिव्हचे आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सक्‍तीचे केले आहे. हे प्रमाणपत्र असल्यास राज्याच्या हद्दीत सात दिवस प्रवासाला परवानगी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशात म्हटले आहे. 

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना दोन व्यक्‍तींसह प्रवासाला परवानगी राहणार आहे. चालक आणि एक मदतनीस यांचा यामध्ये समावेश असेल. परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांप्रमाणेच ट्रकचालकांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त 48 तास ग्राह्य धरले जाईल. त्यापेक्षा जास्त जुने प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. जिल्ह्याच्या हद्दीवर या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. 

बाजार समितीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन होते की नाही, याची जबाबदारी बाजार समितीवर राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यास बाजार समित्या बंद ठेवाव्या लागणार आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com