म्युकरमायकोसिसचा नगरमध्ये पहिला बळी - The first victim of mucormycosis in the city | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

म्युकरमायकोसिसचा नगरमध्ये पहिला बळी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

तालुक्‍यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, कोरोनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

कर्जत : तालुक्‍यातील मिरजगाव (Mirajgaon) येथे म्युकरमायकोसिसने एकाचा मृत्यू झाला, तसेच एक संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. (The first victim of mucormycosis in the city)

तालुक्‍यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, कोरोनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्‍यातील मिरजगावचा म्युकरमायकोसिसचा रुग्ण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणखी एक रुग्ण सापडला असून, तो कर्जत येथे उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

म्युकरमायकोसिसने एक मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, कोरोनावर उपचार घेऊन घरी आलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. या व्यक्तींना कुठला त्रास होत आहे का, याची माहिती मिळविली जात आहे. त्यात कोणाला लक्षणे आढळल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. 

 

सर्वेक्षण सुरू

म्युकरमायकोसिसने तालुक्‍यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक संशयित रुग्णही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, काही त्रास होत असल्यास त्याची माहिती आशा सेविकांना द्यावी. 
- डॉ. संदीप पुंड, तालुका आरोग्याधिकारी, कर्जत 

तातडीने उपचार घ्यावेत

कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांत म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळत आहेत. हा प्रकार नवीन नाही; परंतु कोरोनावर उपचार घेताना स्टेरॉईडचा झालेला मारा, कमी झालेली प्रतिकारशक्ती, यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये हा बुरशीजन्य आजार आढळतो. निदान झाल्यावर लगेच कान, नाक, डोळे, घसा व मेंदूविकार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत. 
- डॉ. दिलीप फाळके, नेत्ररोगतज्ज्ञ, कर्जत 
 

हेही वाचा...

कुकडीचे आवर्तन 20 मे पासून

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख