आधी लस उपलब्ध करा, नंतर वाड्यावर बसून वाटप करा : खासदार विखे यांचा मंत्री तनपुरेंना टोला - First make the vaccine available, then distribute it while sitting on the fence: MP Vikhe's minister called Tanpur | Politics Marathi News - Sarkarnama

आधी लस उपलब्ध करा, नंतर वाड्यावर बसून वाटप करा : खासदार विखे यांचा मंत्री तनपुरेंना टोला

विलास कुलकर्णी
बुधवार, 2 जून 2021

मंत्र्यांनी वाड्यावर बसून लसींचे वाटप करावे. त्यात आम्ही कुठेही हस्तक्षेप करणार नाही.

राहुरी : "केंद्र सरकारतर्फे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. त्यात राज्य सरकारच्या मंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये. राज्य सरकारने लस उपलब्ध करावी; मग मंत्र्यांनी वाड्यावर बसून लसींचे वाटप करावे. त्यात आम्ही कुठेही हस्तक्षेप करणार नाही,'' असा टोला खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता लगावला.  (First make the vaccine available, then distribute it while sitting on the fence: MP Vikhe's minister called Tanpur)

राहुरी कृषी विद्यापीठात आयोजित आढावा बैठकीत खासदार डॉ. विखे बोलत होते. प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, चाचा तनपुरे, शिवाजी सोनवणे, अमोल भनगडे, राजेंद्र उंडे उपस्थित होते. 

खासदार डॉ. विखे म्हणाले, ""राहुरी तालुक्‍यात लसीकरणावरून वारंवार वादंग होत आहे. कोरोना चाचणी केल्याशिवाय लसीकरण करायचे नाही, असा केंद्र सरकारचा आदेश नाही. विनाकारण कोणाचीही कोरोना चाचणी करू नका. ज्यांना लक्षणे आहेत, अशा नागरिकांची चाचणी करण्यास हरकत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही मंत्र्यांच्या दबावाला बळी न पडता काम करावे.'' 

""केंद्र सरकारने जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेच्या व्याजातून नगर जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यात राज्य सरकारचा रुपयाचाही वाटा नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनी या रुग्णवाहिकांवर अधिकार गाजवायचे कारण नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे. जनतेची गैरसोय होणार नाही. लसीकरणात वशिलेबाजी होणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी,'' असेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले. 

 

हेही वाचा...

कृषी सेवा केंद्रांना वेळ वाढवून द्या ः खासदार विखे 

नगर : खरिपातील पेरणीची लगबग लक्षात घेता, जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते सायंकाळी सातदरम्यान वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कृषी सेवा केंद्रचालकांना विविध प्रकारच्या नोंदी कराव्या लागत असतात. या सर्व नोंदी ऑनलाइन असल्याने वेळ जातो. एका शेतकऱ्यास साधारणपणे बियाणे व खते देण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागतो. सध्या कृषी सेवा केंद्रांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत वेळ आहे. ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ शकते. कृषी सेवा केंद्रांना राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

हेही वाचा..

तीन वर्षाची काव्याने खासदारांचा फोटो काढते तेव्हा

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख