अखेर आमदार राजळे यांनी मंत्र्यांच्या बैठकिस अनुपस्थिबाबत खुलासा केलाच ! - Finally, MLA Rajale revealed about the absence of ministers in the meeting! | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर आमदार राजळे यांनी मंत्र्यांच्या बैठकिस अनुपस्थिबाबत खुलासा केलाच !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 एप्रिल 2021

कुटुंबातील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने होम मला होमक्‍वॉरंटाईन व्हावे लागले. कोरोना चाचणीचा अहवाल अद्यापही आलेला नाही.

पाथर्डी : कुटुंबातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांच्या संपर्कात आल्याने मी स्वत:ची कोरोना तपासणी करुन घेतली. त्याचा अहवाल अद्यापही आलेला नसल्याने होमक्‍वॉरंटाईन व्हावे लागले. त्यामुळे शनिवारी पाथर्डी व शेवगाव येथे झालेल्या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला उपस्थित राहाता आले नाही, असे पत्रक आमदार मोनिका राजळे यांनी काढले आहे. 

शेवगाव-पाथर्डी तालुक्‍यात शनिवारी (ता. 24) महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कोरोनाबाबत आढावा बैठका झाल्या. तसेच पाथर्डीत माजी आमदार राजीव राजळे कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. यासह दोन्ही तालुक्‍यात झालेल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. परंतु, कुटुंबातील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने होम मला होमक्‍वॉरंटाईन व्हावे लागले. कोरोना चाचणीचा अहवाल अद्यापही आलेला नाही.

नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, लक्षणे जाणवल्यास चाचणी करावी, असे आवाहन राजळे यांनी पत्रकात केले आहे. 

 

हेही वाचा...

ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरची काळजी करू नका 

शेवगाव : ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिरसाठी प्रयत्न करू. त्यासाठी काळजी करू नका. आपत्कालीन सर्वांनी समन्वय ठेवून काम करणे गरजेचे आहे. राज्य सरकार कोरोना काळात व्यवस्थीत काम करीत आहे, असे आवाहन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

शेवगाव येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयालयात आयोजित कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा शल्य चिकीत्सक सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, कोरोनाची संख्या वाढत असली तरी सरकारने लागू केलेल्या निर्बंधामुळे नागरीक व व्यावसायिकांनी शिस्त पाळावी. स्थलांतरीत व्यक्‍तींमुळे संसर्ग वाढतो. रुग्णसंख्येच्या प्रमाणात बेड उपलब्ध होण्यासाठी कोविड सेंटरची संख्या व क्षमता वाढवणे, योग्य उपचार शारिरीक व मानसिक सुदृढता यामुळे कोरोनामुक्‍त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

नागरिकांनी घाबरुन न जाता लसीकरण करावे. आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहे. त्यांना सहकार्य करावे. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी कोरोनाबाबतचा आढावा घेतला. बोधेगाव येथील आरोग्य सुविधांसाठी ऍड. प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक माधव काटे व शरद सोनवणे यांनी थोरातांना निवेदन दिले. राहुल राजळे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, मेधा कांबळे, बापुसाहेब पाटकेर, अमोल फडके उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख