पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा अधिकाऱ्यांना सोडणार नाही

मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीयोजनेचे काम सुरवातीलाच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ३३ गावांपैकी पाणी घेणाऱ्या बारा गावांना सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते.
Pathardi.jpg
Pathardi.jpg

पाथर्डी : ‘‘महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Govt.) ४४ कोटी रुपये खर्च करून मिरी-तिसगाव पाणीयोजना केली. मात्र, योजनेतील ३३ गावांपैकी बारा गावांना प्यायला पाणी मिळत नाही. योजनेत त्रुटी होत्या तर हस्तातंर का केले? समिती व अधिकारी यांना योजना चालविण्यात आलेले अपयश, ही नामुष्की आहे. पाणी चोरणारे मोकळे व प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड, हे चालणार नाही. योजनेच्या पाइपलाइनवरून पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा, अन्यथा मी अधिकाऱ्यांना सोडणार नाही,’’ असा सज्जड दम ऊर्जा व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. (File charges against water thieves, otherwise the authorities will not release you)

पाथर्डी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित मिरी-तिसगाव पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, गोकुळ दौंड, संभाजी पालवे, बाळासाहेब अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष एकनाथ आटकर, राहुल गवळी, अमोल वाघ, सुनील परदेशी, दत्तू कोरडे यांच्यासह योजनेअंतर्गत गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

‘‘मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीयोजनेचे काम सुरवातीलाच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ३३ गावांपैकी पाणी घेणाऱ्या बारा गावांना सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते. त्याचे महिन्याला बारा लाख रुपये वीजबिल येते. वसुली होत नाही. योजना समितीकडे आहे. समितीला मनुष्यबळ नाही. अशा स्थितीत चोरी होणाऱ्या पाण्यामुळे योजना कुचकामी ठरली आहे. सरपंच समाधानी नाहीत. पाणी चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाई का केली नाही? हे यंत्रणेचे अपयश आहे.

योजनेचे सचिव, गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी आठ दिवसांत योजनेचा सविस्तर अहवाल मला द्यावा,’’ असे तनपुरे यांनी सांगितले.

या योजनेसाठी पाणी मीटर खरेदी करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. डॉ. जगदीश पालवे यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी आभार मानले.

आटकर यांना हटविण्याची मागणी

मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांना समितीच्या अध्यक्षपदावरून हटवा, अशी लेखी मागणी २३ गावांच्या सरपंचांनी तनपुरे यांच्याकडे केली. आटकर यांना हटविण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com