आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना मिळणार 51 कोटी

मग त्यांची एंट्री झाली.त्यांनीसगळी गावे पिंजून काढली.तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पंचवीस वर्षांपुर्वीचा भु-संपादानाचा प्रश्न मार्गी लावण्याचा 'शब्द' दिला आणि तो खराही करून दाखवला आहे.
Rohit pawar1.jpg
Rohit pawar1.jpg

कर्जत : कुकडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात तालुक्यातील भु-संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा. यापुर्वी कधीही न झालेले पाण्याचे नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नसलेला ठावठिकाणा, बुजलेल्या कुकडीच्या चाऱ्या अन् विजलेल्या भु-संपादन मोबदल्याच्या आशा!

मग त्यांची एंट्री झाली. त्यांनी सगळी गावे पिंजून काढली. तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पंचवीस वर्षांपुर्वीचा भु-संपादानाचा प्रश्न मार्गी लावण्याचा 'शब्द' दिला आणि तो खराही करून दाखवला आहे.

ही दमदार कामगिरी केली आहे, युवा आमदार.रोहित पवार यांनी. कारण पुन्हा एकदा कर्जत तालुक्याच्या 8 गावातील शेतकऱ्यांना तब्बल 51 कोटी रुपयांची भु-संपादनाची रक्कम मंजूर करून घेत आमदार पवार यांनी शेतकऱ्यांना सुखद धक्काच दिला आहे. कुकडी नियोजनातील कमी वेळेत खेचून आणलेली ही सर्वात मोठी रक्कम म्हणावी लागेल.

बेनवडी, कोळवडी, करमनवाडी, देशमुखवाडी, तळवडी, आळसुंदे, डोंबाळवाडी, माळंगी या गावांचा यामध्ये सामावेश आहे. या अगोदरही टप्प्याटप्प्यात सुमारे 55 कोटी रुपये आणि आता एकदाच 51 कोटी रुपये म्हणजेच आत्तापर्यंत 106 कोटींचा हा मोबदला शेतकऱ्यांची वचनपुर्ती करणारा ठरला आहे.

गेली 25 वर्षात 6 कोटी रुपयांत समाधान मानावे लागलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात 106 कोटी मिळाले हा बदल नक्कीच 'विकासाचे व्हिजन' साधणारा आहे. आता भु-संपादन मोबदला तर मिळालाच, परंतु शेतकऱ्यांना दिलेला 'टेल टू हेड' चा शब्द पूर्ण करण्यासाठी चाऱ्या अस्तरीकरण, पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी काढलेले डिप कट, दगडमातीने बुजलेल्या चाऱ्या, कालव्यातील काढण्यात आलेला गाळ, कुकडी चाऱ्यांवर बसवण्यात आलेले दरवाजे यासाठीही आमदार पवारांनी 'ना भूतो ना भविष्य' असे भरीव काम केले आहे.

वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेल्या कुकडी डाव्या प्रकल्पाचा परिपूर्ण अभ्यास करून एकाच वर्षाच्या कालखंडात आमदार पवारांनी सर्व प्रश्न मार्गी लावत कुकडीला नवसंजीवनी प्रदान केली आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाला संघर्ष न करता आपल्या हक्काचे पाणी मिळू लागले आहे.

अनेक वर्षे शेतकरी वंचित

भु-संपादनाच्या लाभापासुन गेली 25 ते 30 वर्षांपासुन शेतकरी वंचित राहिले. यात आपल्या हक्काच्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत एका पिढीचे भविष्य संपले. शेतकरी बांधवांच्या व्यथा ऐकून मन खिन्न होत होते. त्यांनी केलेल्या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना दिलेला 'शब्द' मी पाळला आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल आणि खऱ्या अर्थाने याचा फायदा तालुक्याच्या व्यापार व अर्थव्यवस्थेलाही होईल, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com