हे तर सरकारचे अपयश : राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे.
radhakrushna vikhe 1.jpg
radhakrushna vikhe 1.jpg

नगर : मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे (Radhakrushna vikhe) पाटील यांनी व्यक्त केली. (This is the failure of the government: Radhakrishna Vikhe Patil)

विखे पाटील म्हणाले, की या अपयशाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारमध्ये कोणताही समन्वय नव्हता. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाविकास आघाडी सरकार वेळ मारून नेत होती. आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचे नेते सभागृहात भीमगर्जना करीत होते; पण सरकारमधील समन्वयाचा अभावच आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत ठरला आहे. न्यायालयात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनासुद्धा माहिती दिली जात नव्हती. त्यामुळेच आरक्षणाच्या संदर्भात सरकारचे अपयश आजच्या निकालामुळे अधोरेखित झाले आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वच गोष्टींसाठी केंद्रावर अवलंबून राहणार असेल, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडणार? 

निर्णय दुर्देवी ः पाचपुते

मराठा आरक्षण रद्दबातल करण्याचा न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. मराठा समाजास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिले होते. हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हा निर्णय मराठा तरुणांना हताश, निराश करणारा आहे. त्यामुळे सर्वसमावेशक रणनीती आखावी लागेल, तसेच तरुणांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती उपाय योजना करावी, असे मत आमदार बबनराव पाचुपते यांनी व्यक्त केले.

विशेष अधिवेशन बोलवावे ः पिचड

मराठा समाजास सर्वोच्च न्यायालयाने नाकारले, हे ऐकून धक्का बसला व वाईट वाटले. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या राणे समितीत मी स्वतः काम केले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रत्यक्ष जाऊन मराठा समाजाचे अवलोकन करण्याचे भाग्य मला मिळाले. मराठा समाजातील अनेक जण मोलमजुरी करतात. मी त्यांचे हाल प्रत्यक्ष पाहिले आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन शर्थीचे प्रयत्न केले. आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घ्यावा, असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com