फडणवीस लढणारा "कोरोनायोद्धा', शंकरराव कोल्हे यांच्याकडून काैतुक - Fadnavis fighter "Coronayoddha": Shankarrao Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस लढणारा "कोरोनायोद्धा', शंकरराव कोल्हे यांच्याकडून काैतुक

मनोज जोशी
बुधवार, 19 मे 2021

जिल्हा दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर जाऊन माजी मंत्री कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली.

कोपरगाव : "स्वतःच्या जिवाची पर्वा न करता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरे करून प्रशासनावर नजर ठेवून आहेत. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी लढणारे "कोरोनायोद्धा' आहेत,'' असे गौरवोद्‌गार माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांनी काढले. (Fadnavis fighter "Coronayoddha": Shankarrao Kolhe)

जिल्हा दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर जाऊन माजी मंत्री कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हे म्हणाले, ""कोरोना संकटात अनेक नेते, मंत्री घरात बसून काम करीत आहेत. मात्र, फडणवीस हे सामान्य माणसांचे जीव वाचविण्यासाठी राज्यभर दौरे करून माणुसकीच्या नात्याने जनतेला आधार देत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण न्यायालयात त्यांनी टिकवून दाखविले. महाविकास आघाडी सरकार कमी पडल्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले.'' 

फडणवीस म्हणाले, की या वयात माजी मंत्री कोल्हे राजकीय, सामाजिक, सहकारातील कामे करताहेत, हे पाहून प्रेरणा मिळते. कोल्हे-फडणवीस यांच्यात यावेळी विविध विषयांवर गप्पा रंगल्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, "संजीवनी'चे अध्यक्ष बिपीन कोल्हे, जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे व संजीवनी शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे उपस्थित होते. 

कोल्हेंनी सांगितले दीर्घायुष्याचे गुपित 

यावेळी फडणवीस यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना शारीरिक तंदुरुस्तीचे गुपित विचारले. त्यावर त्यांनी कोरफड हे माझ्या दीर्घायुष्याचे गुपित असल्याचे सांगितले. कोरोना संकटात कोणीही घाबरू जाऊ नका. कोरोनावर मात करीत मी उभा आहे. आहार, आरोग्य व व्यायामाकडे लक्ष द्या, असा वडीलकीचा सल्ला त्यांनी यावेळी सर्वांना दिला. 

 

हेही वाचा...

कुकडीचे आवर्तन 20 मे पासून

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख