फडणवीस कोपरगावला आले, पण त्यांनी ई-पास काढला का? कोपरगावातील कार्यकर्त्याचा अर्ज - Fadnavis came to Kopargaon, but did he get an e-pass? Kopargaon worker's application | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस कोपरगावला आले, पण त्यांनी ई-पास काढला का? कोपरगावातील कार्यकर्त्याचा अर्ज

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 मे 2021

रविवारी फडणवीस यांनी अचानक कोपरगाव येथे दैारा केला. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली.

नगर : विधानसभेचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) रविवारी कोपरगावला आले होते. त्यांनी कोरोविषयक नियमांचे उल्लंघण केले असून, त्यांनी जिल्हा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होताका, दहा पेक्षा जास्त लोकांना जमण्यास परवाणगी नसताना जास्त लोक जमले, त्याबाबत परवाणगी घेतली होती का, असा अर्ज कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्याच्या सचिवांना माहितीच्या अधिकारात केला आहे. (Fadnavis came to Kopargaon, but did he get an e-pass? Kopargaon worker's application)

फडणवीस सध्या राज्यभर दाैरे करीत आहेत. कोरोनाविषयक नियमांची त्यांच्याकडून पायमल्ली होत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. रविवारी फडणवीस यांनी अचानक कोपरगाव येथे दैारा केला. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. त्या वेळी कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्याचा आरोप काळे यांनी तक्रारीत केला आहे.

कोपरगावमधील या कार्यक्रमासाठी फडणवीस यांनी जिल्हा बॅंदीबाबत ई-पास काढला होता का, तसेच दहा पेक्षा जास्त लोक जमविण्यासाठी विशेष परवानगी घेतली होती का, असे प्रश्न त्यांनी वचारले आहेत. जर तसे नसेल, तर याबाबत पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाने कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतचे व्हिडिओ व छायाचित्रेही त्यांनी सोबत पाठविले आहेत.

आपल्या राज्यघटनेनुसार सर्वांना सारखेच नियम असतात. राज्यभर लाॅकडाऊन असताना जिल्हा बंदीसारखे नियम आहेत. त्यामुळे कोपरगावच्या कार्यक्रमाची सखोल चाैकशी व्हावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.

 

हेही वाचा...

उजनीतील पाणीसाठा "मायनस'मध्ये 

सिद्धटेक : उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यामुळे ते आता "मायनस'मध्ये आले आहे. मात्र, तरीही धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडले आहे. उजनी धरणाने आता तळ गाठला असून, त्यातून रोज एक टक्का पाणी कमी होत असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. 

दर वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरूनही मे महिन्यात पाणीसाठा "मायनस'मध्ये जातो. मागील वर्षी धरण याच महिन्यात 13 मे रोजी "मायनस'मध्ये गेले होते. असे असले, तरी पावसाळा सुरू होईपर्यंत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने, पाणीपुरवठा योजना, तसेच शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न उद्‌भवणार नाही.

दरम्यान, सध्या मुख्य कालव्यातून 3150 क्‍यूसेक व बोगद्याद्वारे 570 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत धरण आणखी किती खपाटीला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याही परिस्थितीत भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

हेही वाचा...

संगमनेर कोरोनामुक्तीच्या मार्गावर

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख