दररोज शंभर रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन थोरात कारखाना निर्मिती करणार - The factory will produce enough oxygen to supply 100 patients every day | Politics Marathi News - Sarkarnama

दररोज शंभर रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन थोरात कारखाना निर्मिती करणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही, असे सांगून थोरात म्हणाले, की दुसऱ्या लाटेत अनेकांनी प्राण गमावले. आता तर टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे.

संगमनेर ः महाराष्ट्रातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी (Sugar Factary) आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले. त्याअंतर्गत थोरात कारखाना ऑक्सिजन निर्मिती करणारा तीसरा कारखाना ठरला आहे. या प्रकल्पातून दररोज 100 रुग्णांना पुरेल इतका सुमारे 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली. (The factory will produce enough oxygen to supply 100 patients every day)

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, की कोरोना संकटात पारदर्शक व प्रभावी काम केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. या उलट कोरोना मृत्यूचे आकडे लपवलेल्या राज्यांमधील दुर्दैवी कोविड रुग्णांचे मृतदेह गंगेवर तरंगल्याने त्यांचे बींग फुटले. 

कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही, असे सांगून थोरात म्हणाले, की दुसऱ्या लाटेत अनेकांनी प्राण गमावले. आता तर टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. त्यात राज्यात सुमारे 50 लाख रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रत्येकाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. त्याअंतर्गत थोरात कारखाना ऑक्सिजन निर्मिती करणारा तीसरा कारखाना ठरला आहे. कारखाना ठरला आहे. या प्रकल्पातून दररोज 100 रुग्णांना पुरेल इतका सुमारे 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार आहे. आज निळवंडे धरणाजवळील पहिल्या बोगद्याचे ब्लास्टिंग करून तो बोगदा खुला करण्यात आला. हा एक सुवर्णयोग आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यातून 2022 च्या पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी अत्यंत गतीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, विष्णुपंत रहाटळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा..

देशमुखांच्या घरावर छापा पडताच मंत्री थोरात कडाडले

 

 

 

 

 

Edited by - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख