म्युकरमायकोसिसमुळे गमावला डोळा, उपचारासाठी गाव झाला गोळा - Eye lost due to mucormycosis, village gathered for treatment | Politics Marathi News - Sarkarnama

म्युकरमायकोसिसमुळे गमावला डोळा, उपचारासाठी गाव झाला गोळा

सतीश वैजापूरकर
शनिवार, 22 मे 2021

जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्याने गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वांच्या मदतीतून उपचारासाठी तब्बल सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात आले. 

शिर्डी : जिवावर बेतले ते डोळ्यावर निभावले. कोविडचे अपत्य असलेल्या म्युकरमायसोसिसने आपले क्रौर्य दाखविले. त्याच्या विरोधातील लढाईत पिंप्री निर्मळ (Pimpari Nirmal) येथील प्रेमराज निर्मळ (वय 47) यांना आपला एक डोळा गमवावा लागला. (Eye lost due to mucormycosis, village gathered for treatment)

जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्याने गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वांच्या मदतीतून उपचारासाठी तब्बल सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात आले. आठवडाभरात ते ही लढाई जिंकतील व गावी परततील, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. 

प्रेमराज यांची घरची तीन एकर जमीन, दरमहा दहा हजार रुपये पगाराची खासगी नोकरी, बॅंकेत डाळिंबाच्या शेतीतून मिळालेली सात-आठ लाख रुपयांची शिल्लक, असा आनंदात प्रपंच सुरू होता. कोविड बाधेचे निमित्त झाले. त्याचे रूपांतर म्युकरमायसोसिसमध्ये झाले. या दीड महिन्याच्या लढाईत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. एक डोळा गमवावा लागला. गावचे सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी एक ते दीड लाखाची मदत केली. 

प्रेमराज यांचे मित्र महेश वाघे, निखिल निर्मळ, अभिजित निर्मळ, करण कोळगे व सिद्धार्थ घोरपडे यांनी सोशल मीडियावरून आर्थिक मदतीचे आवाहन केले. अवघ्या चार दिवसांत दोन लाखांची मदत गोळा झाली. मिलाफ या सोशल मीडियावरील साइटच्या माध्यमातून अडीच लाख रुपये मिळाले. उर्वरित पैसे नातेवाइकांनी धावपळ करून उभे केले. जिवावर बेतले, ते डोळ्यावर निभावले. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.

तरुणांचा पुढाकार

कोविड काळात गरजूंना मदत करण्यासाठी गावातील तरुण वर्ग पुढाकार घेतो. प्रेमराज निर्मळ यांच्यावर म्युकरमायसोसिसने अकस्मात हल्ला चढविला. गावातील प्रत्येक घरात हळहळ व्यक्त केली जात होती. सर्वांनी उत्स्फूर्तपणे यथाशक्ती मदत केली. 
हा आजार सामान्यांच्या आवाक्‍यापलीकडचा आहे. राज्य सरकारने अशा वेळी तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यायला हवा. 
- महेश वाघे, सामाजिक कार्यकर्ते 

हेही वाचा...

खतांच्या किमतीमुळे दिलासा ः विखे

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख