अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर ! महापौरांसाठी मतदान आॅनलाईन पद्धतीने होणार

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अवघे दोनच कार्यालयीन दिवस मिळाले आहेत. नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केली आहे.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर : महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांनी आज (शुक्रवारी) सकाळी जाहीर केला. त्यानुसार उमेदवारी अर्ज मंगळवारी (ता. २९) दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. बुधवारी (ता. ३०) ऑनलाइन पद्धतीने मतदानप्रक्रिया होईल. (Election program finally announced! Voting for mayor will be online)

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अवघे दोनच कार्यालयीन दिवस मिळाले आहेत. नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केली आहे.

उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करण्यासाठी २८ व २९ जून हे दोन दिवस असणार आहेत. उमेदवारी अर्ज मंगळवारी (ता. २९) दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येतील. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता महापौरपद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. याअगोदर दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर आवश्‍यकता भासल्यास मतदानप्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज महापालिकेतील नगरसचिव कार्यालयामध्ये उपलब्ध होतील.

दरम्यान, महापौर कोण होणार, याबाबत राजकीय खलबते सुरू आहेत. शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर होणार असल्याचे वरिष्ठ पातळीवर ठरले असले, तरी नगरमधील काॅंग्रेस नेत्यांनी असे काहीच ठरले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. गेल्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादीने भाजपला साथ देत भाजपचा महापौर झाला होता. आता मात्र महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादीत वाटाघाटी होऊन शिवसेनेला महापौरपद देण्याचे ठरले आहे. त्यानुसार येत्या 30 तारखेला होणाऱ्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या सर्व घडामोडीत भाजप सत्तेत राहण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजपचा पत्ता कट झाला. राजकीय घडामोडीत मात्र काॅंग्रेसला काहीच मिळू शकले नाही.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com