पाथर्डीत भर चाैकात तुंबळ हाणामारी, आठ जखमी : सात मोटारसायकलचा चुराडा

सुमारे पंधरा मिनिटेचाललेल्या मारमारीत सात मोटारसायकल फोडल्या. शहरात दंगलसदृष्य परस्थितीकाही काळ निर्माण झाली होती.
maramari.jpg
maramari.jpg

पाथर्डी : शहरात (Pathardi) अजंठा चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिरसाठवाडी येथील युवक विरुद्ध भिकनवाडा (मुस्लीमवस्ती) युवकांच्या दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यामधे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी तलवारी, लोखंडीराँड, चाकुल काठ्यांचा वापर केला गेला. (Eight injured in stampede in Pathardi: Seven motorcycles crushed)

सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या मारमारीत सात मोटारसायकल फोडल्या. शहरात दंगलसदृष्य परस्थिती काही काळ निर्माण झाली होती. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. येथीलवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती सरपाते यांनी पाच दिवसाची पोलिस कोठडी पाच संशयीत आरोंपींना सुनावली आहे.

शहरात दंगल नियंत्रण विभागाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांच्या पंचवीस व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरातील अजंठा चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटात लोखंडी रॉड, तलवारीने आपसात तुंबळ हाणामारी झाली. आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी नगर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परस्पर विरोधी खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, घातक हत्याराने हल्ला करणे बाबत गुन्हे दाखल केले आहेत.

गणेश बाळासाहेब शिरसाठ रा.शिरसाटवाडी याने पोलिसात फिर्याद दिली आहे की. मी व महादेव बाळासाहेब शिरसाट, नितीन नवनाथ शिरसाट, नवनाथ यशवंत शिरसाठ रा. शिरसाठवाडी हे अजंठा चौकात दुध विक्री करत होतो. या वेळी भिकनवाडा येथील मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागला व दुध सांडले. त्याला आम्ही दुध सांडल्याचा जाब विचारल्याचा राग आला. त्याने फारुख रफीक शेख, लाला रफीक शेख, निजाम रफीक शेख, जुबेर फारूख शेख, छोट्या राजू पठाण, जुबेर शफीक आतार, मुन्ना शेख (मटनवाला), भैय्या शेख, काल्या निजाम शेख, रंगनाथ गायकवाड, सोहेल पठाण, बब्बू रिक्षावाला, सुरज दहीवाले, असिफ शेख व इतर 10 ते 12 जणांना बोलावुन घेतले.

या सर्वांनी फिर्यादी व त्यांचे सहकार्यांना तलवार, चाकू, लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केले. दुसरी फिर्याद अमीर उर्फ मुन्ना निजाम शेख याने दिली आहे. मुन्नाच्या गाडीचा धक्का लागल्याने राग येवुन गोकुळ शिरसाठ , देवा शिरसाठ , प्रवीण शिरसाठ , गणेश शिरसाठ ,नितीन शिरसाठ, संजय उर्फ हुंबल शिरसाठ ,महादेव शिरसाट, नवनाथ शिरसाट, रामा शिरसाट,राहुल शिरसाट, यांच्यासह 10 ते 12 जणांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना तलवार, लोखंडी गज, लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फारूक रफिक शेख, जुबेर शफीक आतार, भैय्या शेख, कलंदर शेख, हमीद नजीर शेख या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत सात ते आठ दुचाकीचे नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळापळ झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी मंगळवारी रात्री घटनास्थळाला भेटी दिल्या.

घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे तपास करीत आहेत. अटक केलेल्या पाच संशयीतांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती सरपाते यांच्या समोर पोलिसांनी बुधवारी हजर केले. सरपाते यांनी पाचही संशयीतांना 30 मे 2021 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती भयंकर असताना अशा प्रकारच्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य हतबल होत आहेत.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com