पारनेरच्या डाॅ. राजेश डेरे यांच्या मुंबईतील सेवेबाबत लता मंगेशकर यांनी पाठविले पत्र

जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून रेणवडी (ता. पारनेर) येथील डाॅ. राजेश डेरे यांची रूग्णसेवा सुरू आहे.
 Mangeshkar.jpg
Mangeshkar.jpg

टाकळी ढोकेश्वर : मुंबई महानगरपालिकेच्याच्या पुढाकारातुन वांद्रे -कुर्ला संकुलात 2 हजार 208 रूग्ण संख्या क्षमता असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून रेणवडी (ता. पारनेर) येथील डाॅ. राजेश डेरे (Dr. Rajesh Dere) यांची रूग्णसेवा सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह राज्यातील प्रमुखांनी त्यांचे कौतुक केले आहे. (Dr. Parner. Letter sent by Lata Mangeshkar regarding Rajesh Dere's service in Mumbai)

मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत रूग्णसंख्या वेगाने असताना 18 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड समर्पित रूग्णालयाचे मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून हस्तांतरण करण्यात आले. 2 हजार 208 रूग्ण संख्या क्षमता असणाऱ्या या जम्बो कोविड सेंटर मध्ये 868 क्षमतेचे ऑक्सिजन सहीत, डायलेसीस साठी 12 बेड उपलब्ध आहेत.

मोठ्या प्रमाणात रूग्ण येथे दाखल होत आतापर्यंत 22 हजार 738 रूग्ण येथुन मोफत उपाचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याच ठिकाणी लसीकरण कक्षही करण्यात आला आहे. येथून दोन लाख 31 हजार 214 नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. एकुण 378 डाॅक्टर,399 परिचारिका,513 वार्ड बाॅय येथे काम करत आहेत.

डाॅ. डेरे हे या सर्वांच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून ही सर्व व्यवस्था ठामरित्या सांभाळत आहे. डाॅ. डेरे हे मुंबई मधील सात हजार रूग्ण क्षमतेचे असणारे सात जम्बो कोविड सेंटर मधेही समन्वयकाची भुमिका बजावत आहे. या ठिकाणी अजुन तीन कोविड सेंटरचे उभारणीचे काम सुरू आहे.

शिर्डीमधील नव्याने होत आसलेले चार हजार रूग्ण क्षमतेचे कोविड सेंटरमध्ये ही डाॅ. डेरे यांचाच अनुभव कामी येते आहे  तेथेही ते राज्य सरकारकडुन समन्वयकाची भुमिका बजावत जगातील सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर मुंबईमधील कोविड सेंटरचे कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेष्ठ गायिका लता मंगेशकर, जेष्ठ कलाकार सचिन पिळगावकर यांच्यासह इतरांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. लतादीदींनी डाॅ. डेरे यांना पत्र पाठवत आपण करत असलेल्या रूग्णसेवेला सलाम अशा शब्दात त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा..

रूग्णांची अद्यावत व्यवस्था येथे करण्यात आली आहे  पी. पी. टी. किट धारण करून व अधिकृत कारणाशिवाय कोणालाही या सेंटर मध्ये प्रवेश दिला जात नाही. रूग्णांच्या बाहेरून येणाऱ्या इतर वस्तुंसाठीही ठराविक जागा ठेवण्यात आली आहे. तेथुन पी.पी.टी किट धारण कर्मचारी ती वस्तु सॅनिटायझर करून आत नेतो.

डाॅ. डेरे याबाबत सांगतात, की रूग्णांवर वेळेत उपाचार व वेगात करण्यात येणारे लसीकरण हा एकमेव उपाय कोरोना आजारावर आहे. नागरीकांनी लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता टेस्ट करावी. त्यावर उपचार घ्यावेत, हा आजार बरा होतो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

Edited :By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com