रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करून मला ज्ञान शिकवू नका : तनपुरे यांचा खासदार विखेंना टोला - Don't teach me knowledge by inspecting empty Kovid Center: Tanpure MP Vikhenna Tola | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करून मला ज्ञान शिकवू नका : तनपुरे यांचा खासदार विखेंना टोला

विलास कुलकर्णी
बुधवार, 2 जून 2021

कोरोना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे; परंतु केंद्राच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरण रेंगाळले, हे अपयश आहे.

राहुरी : स्थानिक कार्यकर्त्यांच्या चुकीच्या माहितीवर खासदार डॉ. सुजय विखे (Sujay vikhe) यांनी लसीकरण प्रक्रियेवर बोट ठेवून माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन व दुर्दैवी आहेत. कोरोना प्रादुर्भावात राजकारण नको होते. कोरोनाची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करून, मला ज्ञान शिकवताना भान ठेवणे अपेक्षित होते, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत सांगितले. (Don't teach me knowledge by inspecting empty Kovid Center: Tanpure MP Vikhenna Tola)

मंत्री तनपुरे म्हणाले, ""कोरोना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे; परंतु केंद्राच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरण रेंगाळले, हे अपयश आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसी मिळत आहेत. खासदार विखेंनी माझ्यावर आरोप करीत वेळ घालविण्यापेक्षा पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटून जास्त लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. केंद्राच्या कोविड ऍपवर ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यांवर नागरिक नोंदणी करू शकत नाहीत. राहुरी तालुक्‍याबाहेरील नागरिकांनी नोंदणी करून लस घेतली. लसीकरणाचा फज्जा उडाला.'' 

""वाड्यावर बसून लसीकरण प्रक्रिया राबविली नाही. शासकीय अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन लसीकरण प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. त्यांना निर्देश देणे म्हणजे दबाव टाकणे नाही. केंद्राच्या निधीच्या व्याजातून जिल्ह्यात रुग्णवाहिका खरेदी केल्या. व्याजाची रक्कम खर्च करण्याचा राज्याला अधिकार आहे. तालुक्‍यातील पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण शासनाचा प्रतिनिधी म्हणून केले. त्यापूर्वी कोणी लोकार्पण केले, यावर माझा आक्षेप नव्हता. लसीकरणापूर्वी कोरोना चाचणी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी लस घेतली तर दुष्परिणाम होतात. चाचण्या वाढवायच्या होत्या, एवढाच त्यामागे उद्देश आहे,'' असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

कोविड सेंटरला 50 हजारांची मदत 

तिसगाव : पाथर्डी तालुक्‍यातील मिरी येथील दत्तकृपा कोविड सेंटरला ख्रिश्‍चन व मुस्लिम समाजातर्फे 50 हजार रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य राहुल गवळी व सरपंच आदिनाथ सोलाट यांनी दिली.

या वेळी नाशिक धर्मप्रांताचे बिशप रेव्हरंड शरद गायकवाड, त्यांच्या पत्नी रेव्हरंड मेघा गायकवाड, प्रशांत पगारे, कुमार लोंढे, केनिथ कालसेकर, सरोज साळवे, राहुल पाटोळे, दिनेश सोनावणे, जनार्दन मिरपगार, सुनील औताडे यांच्या उपस्थितीत पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. जाकिर पटेल, राजू इनामदार, इमरान शेख, मेहबूब शेख, अज्जू इनामदार, राजू शेख यांनीही पंचवीस हजार रुपये दिले. 

 

हेही वाचा..

तीन वर्षाची काव्या, खासदारांचा फोटो काढते तेव्हा

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख