मी डाॅक्टर म्हणून सांगतोय, "रेमडेसिव्हिर' हा रामबाण उपाय नाही : खासदार विखे पाटील 

या इंजेक्‍शनशिवाय अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यासाठी धावपळ करू नये.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

पारनेर : सध्या सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले आहे. कोरोना आजार झालेल्या रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनसाठी धावफळ करीत आहेत. मी सुद्धा डॉक्‍टर आहे. त्यामुळेच सांगतो, रेमडेसिव्हीर हा कोरोनावरील रामबाण उपाय नाही. या इंजेक्‍शनशिवाय अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यासाठी धावपळ करू नये, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना केले. 

तालुक्‍यातील विविध कोव्हिड सेंटरर्सला आज खासदार विखे पाटील यांनी भेटी दिल्या व तेथील रुग्ण, डॉक्‍टर यांच्याशी बातचित केली. भेटीनंतर पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला सर्वांनी एकत्रीपणे सामोरे जाण्याची गरज आहे. जनतेच्या हितासाठी राजकारण सोडून या आजाराचा मुकाबला करावा. कोरोनावर कोणताही निश्‍चित असा उपाय किंवा औषध नाही. त्याचा अंदाज बांधता येत नाही. कोरोनापासून रुग्णांना वाचविण्यासाठी आज फक्त ऑक्‍सिजनची नितांत गरज आहे. त्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करत आहेत. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, तहसिलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. मनिषा उंद्रे, डॉ. अभिलाशा शिंदे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, या वेळी तहसीलदार व संबधित अधिकाऱ्यांचे उपस्थितांची कौतुक केले. 

हेही वाचा...

कोविड सेंटरच्या मदतीला सरसावताहेत हात 

पाथर्डी : तालुक्‍यात विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यास लोकप्रतिनिधींसह नागरिक मदतीचा हात देत असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहते. 

तालुक्‍यातील शिक्षकांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कोविड सेंटरला केली. मंत्री प्राजक्त तनपुरे, सभापती सुनीता दौंड व गोकुळ दौंड, ऍड. प्रताप ढाकणे, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, ज्योती ढाकणे, राहुल गवळी, संध्या आठरे, राजेंद्र पवार, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आर्थिक सहकार्य केल्याने सुमारे बाराशे कोविड रुग्णांना उपचार व दोन घास मिळत आहेत. अभय आव्हाड यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले आहे. बर्ड संस्थेने व श्री तिलोक जैन विद्यालयाने महिलांसाठी पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. मिरीत राहुल गवळी यांनी लोकवर्गणीतून दत्त कोविड मंदिर सुरू केले आहे.

तिसगावच्या कोविड सेंटरला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेड दिले. तसेच जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे व सुनील परदेशी यांनी बेड दिले. 

गोकुळ दौंड यांनी आगसखांड शिवारात तीनशे बेडचे स्व. गोपीनाथ मुंडे कोविड सेंटर सुरु केले. प्रताप ढाकणे यांनी केदारेश्‍वर कारखाना व कै. सुमन ढाकणे प्रतिष्ठानच्या वतीने पाथर्डीत व बोधेगाव येथे कोविड सेंटर सुरू केले. खरेदी-विक्री संघ, आदी फाउंडेशन, नगरपरिषदेने कोविड सेंटर सुरू केले. तालुक्‍यातील शिक्षकांनी त्यास पाच लाख रुपयांची मदत केली. माजी आमदार चंद्रशेखर घुले मित्र मंडळाने रुग्णांना सकस अहार केंद्र सुरू केले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, डॉ. अशोक कराळे हे सहकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झटत आहेत. पोलिस व महसूल विभागाही त्यांना मदत करत आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com