ऊस गाळपात "ज्ञानेश्‍वर' राज्यात चौथा, नरेंद्र घुलेंचे नेतृत्त्व - Dnyaneshwar is fourth in the state in sugarcane crushing, led by Narendra Ghule | Politics Marathi News - Sarkarnama

ऊस गाळपात "ज्ञानेश्‍वर' राज्यात चौथा, नरेंद्र घुलेंचे नेतृत्त्व

सुनिल गर्जे
बुधवार, 12 मे 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 लाख 51 हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केला आहे.

नेवासे : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 लाख 51 हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केला आहे. त्यामुळे ऊस गाळपात कारखाना राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ज्ञानेश्‍वर उद्योगसमूहाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले (Narendra Ghule) यांनी दिली. (Dnyaneshwar is fourth in the state in sugarcane crushing, led by Narendra Ghule)

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या 47 व्या गळीत हंगामाची सांगता डॉ. घुले व संचालक व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते आज (ता.12) गव्हाणीत शेवटची उसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, ऍड. देसाई देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, सदस्य दत्तात्रेय काळे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, काशिनाथ नवले, प्रा. डॉ. नारायण म्हस्के, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे उपस्थित होते. 

त्यानंतर डॉ. घुल पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""2020-21 या गळीत हंगामात कारखान्याने 14 लाख 51 हजार मेट्रिकपेक्षा अधिक टन उसाचे गाळप करून 15 लाख 70 हजार पोती साखर उत्पादन केले. कोरोनाचे संकट, आवकाळीसह विविध अडचणींवर मात करत "ज्ञानेश्‍वर'ने शेतकरी, अधिकारी व कामगार, ऊसतोडणी कामगार यांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी केला. 

हेही वाचा...

फकिर योद्ध्याला सलाम

प्रास्ताविक कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले. यावेळी संचालक काशिनाथ नवले, मच्छिंद्र म्हस्के, गणेश गव्हाणे, डॉ. शिवाजी शिंदे, दादा गंडाळ, अशोक मिसाळ आदी उपस्थित होते. 

10.75 कोटी युनिट वीजनिर्मिती 

"ज्ञानेश्‍वर'च्या सहवीजनिर्मिती प्रकल्पात या हंगामात 10 कोटी 75 लाख युनिट वीजनिर्मिती झाली. पैकी सहा कोटी 70 लाख युनिट वीज महावितरणला वितरित केली, तर स्पिरिटचे उत्पादन 91 लाख लिटर झालेले आहे, अशी माहिती ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील घुले यांनी यावेळी दिली. 

 

 

 

Edied By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख