कुकडी सल्लागार समिती बरखास्त करा  - Dismiss the Poultry Advisory Committee | Politics Marathi News - Sarkarnama

कुकडी सल्लागार समिती बरखास्त करा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील नेतेमंडळींकडुन होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. तसेच हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहीजे, यासाठी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आता राजकीय जोडे बाजुला ठेवून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

निघोज : कुकडीच्या (Kukadi) पाणीवाटपाचे नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीवर राजकीय नेते मंडळी असल्याने पारनेरसह नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होतो. हा अन्याय दुर करण्यासाठी कुकडी कालवा सल्लागार समिती बरखास्त करा, अशी मागणी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे (Vishvanath Korde) यांनी या बैठकीत केली. (Dismiss the Poultry Advisory Committee)

कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील नेतेमंडळींकडुन होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. तसेच हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहीजे, यासाठी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आता राजकीय जोडे बाजुला ठेवून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. 

लाभक्षेत्राच्या प्रमाणात आम्हाला पाणी मिळालेच पाहीजे यासाठी संघर्ष करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी आता कंबर कसली आहे. राजकीय पुढाऱ्यांना बाजुला ठेवून लढा उभारुन कुकडीचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. जवळा (ता. पारनेर) येथे आज पारनेर तालुक्‍यातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुकडीच्या पाणी वाटपात सातत्याने अन्याय होत आहे. यापुढे अन्याय सहन न करता हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कुकडीचे आवर्तन लागल्याने पारनेर तालुक्‍यातील शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. तीव्र पाणी टंचाईमुळे कोट्यवधींची शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. मात्र, कुकडीचे पाणी आता न्यायप्रविष्ठ असल्याने ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांकडून नेहमी अन्याय होत आहे. राजकीय साठमारीत पारनेर तालुक्‍यातील शेतकरी नेहमीच वाऱ्यावर सोडले जातात.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

यामुळे भविष्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दुर करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्‍यातील लाभधारक शेतकऱ्यांची एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत संघर्ष उभारताना राजकीय जोडे बाजुला ठेवुन हा लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
सभापती गणेश शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, संदीप पाटील, सचिन वराळ, ठकाराम लंके, कैलास शेळके, प्रदिप सोमवंशी, शिवाजी सालके, मंगेश सालके आदींनी चर्चेत सहभाग घेतला. निघोज, जवळा, वाडेगव्हाण, राळेगण थेरपाळ आदी लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. 
 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख