माणुसकीला काळीमा ! नेवासे तालुक्यात चिमुरड्याची हत्या, चांद्याच्या घटनेची आठवण

मंगळवारी सकाळी सहा वाजेच्यासुमारास सोहमचा मृतदेह रामडोह रस्ता लागत पाटचारी रस्त्याकडेला दगडाने डोके ठेवून छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.
Crime.jpg
Crime.jpg

नेवासे : तालुक्यातील वरखेड (Varkhed) येथे एका आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. मंगळवारी (ता. ६) रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत हा मृतदेह नागरिकांना आढळला. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने यापूर्वी घडलेल्या चांदे येथील हत्याकांडाची आठवण नेवासेकरांना झाली. त्या वेळीही अशाच क्रुरपणे बालकाची हत्या करण्यात आली होती. त्या वेळी महाराष्ट्र हादरला होता. (Disgrace to humanity! Who is Naradham who killed Chimurda by stoning him to death?)

बारकू उर्फ सोहम उत्तम खिलारे (वय ८, राहणार बुलढाणा, हल्ली वरखेड, ता. नेवासे) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. मयत सुयोग हा गेली सात-आठ वर्षांपासून आपली आई सिमा व आदित्य-पंकज यादोघाभवांसह समाधान महादू ब्रह्मणे यांच्यासोबत वरखेड येथे एकत्र राहत होता.

दरम्यान, सोहम सोमवार (ता. ५) रोजी सायंकाळी सात कुणालाच न सांगता घरा बाहेर गेल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सकाळी सहा वाजेच्यासुमारास सोहमचा मृतदेह रामडोह रस्ता लागत पाटचारी रस्त्याकडेला दगडाने डोके ठेवून छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी घटनस्थळी पाहणी करून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

मयत सोहमचा सावत्र वडीलांकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा आहे. तो अनेकवेळा गावात भाकरी मागत. त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे बाहेरचे कोणी असणे शक्यच नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

याप्रकरणी वरखेडचे पोलीस पाटील संतोष भागिरथ घुंगासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनस्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकास प्रचारण केले होते.

'उत्तम'ला झाली होती मारहाण.!

पत्नी मुलांसह समाधान बरोबर पळून आल्यानंतर त्यांच्या शोधात वरखेड येथे मुलांना घेण्यासाठी आलेल्या मयत सोहम'चे वडील उत्तम खिलारे यांना गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी सिमा व समाधान यांनी जबर मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला आहे.

लवकरच गुन्हेगारांना अटक करू

"सोहम हत्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलद गतीने तपास चालू असून लवकरच गुन्हेगारांना अटक करू. त्याची आई सिमा व समाधान यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
- विजय करे, पोलीस निरीक्षक, नेवासे
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com