कोविड रुग्णालयात दक्षता न घेता घुसल्याने शिर्डीत काॅंग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा - Crime against Congress mayor in Shirdi for entering Kovid hospital without vigilance | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड रुग्णालयात दक्षता न घेता घुसल्याने शिर्डीत काॅंग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 मे 2021

चौगुले व अरुण जाधव यांच्यावर साथ रोग अधिनियमनाचे उल्लंघनसह कोविड रूग्णालयात बेकायदा प्रवेश करणे अशा आशयाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

शिर्डी : साईसंस्थानच्या कोविड रूग्णालयात मध्यरात्री कोणतीही दक्षता न घेता प्रवेश केल्या प्रकरणी काँग्रेसपक्षाचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या विरोधात साईसंस्थानच्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला. (Crime against Congress mayor in Shirdi for entering Kovid hospital without vigilance) 

याबाबत माहीती देताना पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे म्हणाले, गेल्या 9 मे रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चौगुले व साईसंस्थानचे विद्युत विभागाचे कर्मचारी अरुण जाधव यांनी साईबाबा रूग्णालयातील कोविड वार्डात परवानगी न घेता, पीपीई किट परिधान न करता प्रवेश केला. तेथील उपचार घेत असलेल्या रूग्णांची भेट घेतली. यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. अशा आशयाची फिर्याद संस्थानच्या सीसीटीव्ही विभागाचे किशोर गवळी यांनी आज (ता.14) दिली. त्यावरून चौगुले व अरुण जाधव यांच्यावर साथ रोग अधिनियमनाचे उल्लंघनसह कोविड रूग्णालयात बेकायदा प्रवेश करणे अशा आशयाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

याबाबत पत्रकारांशी बोलताना चौगुले म्हणाले, रूग्णालयातील गलथान कारभार सोशल मिडीद्वारे आपण पुढे आणला होता. माझ्या एका नातेवाईकाला त्रास होत असल्याने रूग्णालयात गेलो होतो. तेथील अव्यवस्था पाहून मुख्य कार्यकारी अधिकरी कान्हूराज बगाटे यांचे लक्ष वेधले. त्याचा राग आल्याने माझ्यावर हा गुन्हा दाखल झाला. राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील. या रूग्णालयात आमदार, खासदार व अधिकारी अनेकदा पीपीई किट न घालता जातात. त्यांच्यावर असे गुन्हे दाखल केले जाणार आहेत का. 

 

हेही वाचा...

ज्येष्ठांना लसीकरणाचा दुसरा डोस उपलब्ध 

अमरापूर : ढोरजळगाव-शे (ता. शेवगाव) येथील आरोग्य केंद्रात चाचण्या व लसीकरणासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ढोरजळगाव-ने येथील आरोग्य उपकेंद्रात पहिला डोस घेऊन 45 दिवस झालेल्या नागरिकांसाठी दुसऱ्या डोसची लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ढोरजळगाव-नेच्या सरपंच गौरी उकिर्डे यांच्या हस्ते झाला.

माजी सरपंच अनंता उकिर्डे, गणेश कराड, बुवासाहेब केकाण, बाळासाहेब कराड, सुखदेव उकिर्डे, जयकुमार देशमुख, साईनाथ गरड उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी शंकर चौधरी, शिशिर शिरसाठ, आरोग्य सेविका सुलभा कळमकर, आरोग्य सेवक कारभारी शिरसाठ, पर्यवेक्षक रामनाथ कराड, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून लसीकरण सत्र राबवले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, आरोग्य विस्ताराधिकारी डॉ. सुरेश पाटेकर यांनी पाहणी करून सुचना दिल्या. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख