कोरोना कमी होतोय ! मागील नऊ दिवसांत रुग्णसंख्या कमी - Corona is running low! The number of patients decreased in the last nine days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

कोरोना कमी होतोय ! मागील नऊ दिवसांत रुग्णसंख्या कमी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

महापालिका आयुक्त गोरे महापालिकेतून अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. आमदार संग्राम जगताप व महापौर वाकळे रस्त्यावर उतरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

नगर : महापालिकेचे प्रयत्न व नागरिकांच्या सतर्कतेमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मागील नऊ दिवसांत हा आलेख सातत्याने खाली येत असला, तरी नागरिकांनी सतर्क राहून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शहरात कडक "लॉकडाउन' जाहीर केला आहे. मात्र त्याची नागरिकांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. असे असले, तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे, तसेच आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नियोजनामुळे शहरात कोरोना आटोक्‍यात येऊ लागला आहे. मागील नऊ दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे.

महापालिका आयुक्त गोरे महापालिकेतून अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. आमदार संग्राम जगताप व महापौर वाकळे रस्त्यावर उतरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

हेही वाचा..

श्रीगोंद्यात मृत्यू दडविले

महापौर वाकळे यांनी आरोग्य समिती स्थापन केली आहे. ही समिती व महापौर शहरातील आरोग्य स्थितीवर बारकाईने लक्ष देत आहेत. महापौरांना मातृशोक असूनही नागरिकांसाठी आरोग्य केंद्रे, कोविड सेंटर, ऑक्‍सिजन प्रकल्प आदींना भेटी देणे सुरू ठेवले आहे. महापालिकेतील कर्मचारी व दक्षता पथके शहरात जोरदार कारवाई करीत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका जगातील तज्ज्ञांनी अधोरेखित केला असल्याने, महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नियमांचे पालन करा

कडक "लॉकडाउन' व नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात अँटिजेन चाचण्या सुरू आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर, नगर 

रुग्णसंख्या 
4 मे - 622 
5 मे - 766 
6 मे - 674 
7 मे - 732 
8 मे - 442 
9 मे - 421 
10 मे - 284 
11 मे - 195 
12 मे - 250 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख