कोरोनाने पाडव्याचा मुहूर्त साधला; "रेकॉर्ड ब्रेक' रुग्ण - Corona made the moment of Padva; "Record break 'patient | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

कोरोनाने पाडव्याचा मुहूर्त साधला; "रेकॉर्ड ब्रेक' रुग्ण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता एक लाख 20 हजार 699 झाली आहे. आतापर्यंत 1334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नगर : गुढीपाडव्याचा सण सर्वत्र आनंदात साजरा करण्यात आला असला, तरी कोरोबाधितांचा आजचा आकडा मनात धडकी भरविणाराच निघाला. जिल्ह्यात मंगळवारी (ता. 13) कोरोनाचे 2654 रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याचे दोन वर्षांतील हे "रेकॉर्ड' आहे. 

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता एक लाख 20 हजार 699 झाली आहे. आतापर्यंत 1334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेल्यांची संख्या 14 हजार 264 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 651, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत 582, रॅपिड अँटिजेन चाचणीत 1421 रुग्ण आढळून आले. नगर शहरातील 476 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या उत्तरेतील तालुक्‍यात रुग्णसंख्या मोठी आहे. कोपरगाव तालुका रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिवसभरात 294 रुग्ण तेथे आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः कोपरगाव 294, संगमनेर 219, राहाता 215, श्रीरामपूर 200, कर्जत 162, राहुरी 151, अकोले 145, श्रीगोंदे 124, पारनेर 119, नेवासे व पाथर्डी प्रत्येकी 114, नगर 105, शेवगाव 92, जामखेड 33, भिंगार उपनगर 71, लष्करी रुग्णालय 7, तसेच परजिल्ह्यातील 13 रुग्णांचा यात समावेश आहे. 

हेही वाचा...

कोल्हेंकडून कोविड सेंटरला ऑक्‍सिजन सिलिंडर 

कोपरगाव : येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना गुढीपाडव्यानिमित्त औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते पुरणपोळीचे जेवण देण्यात आले, तसेच ऑक्‍सिजन सिलिंडर व ऑक्‍सिकॉन्स्ट्रेटर व 300 रुग्णांना पुरेल एवढ्या औषधांचा पुरवठा संजीवनी उद्योगसमूहाच्या वतीने करण्यात आला. 

कोल्हे म्हणाले, ""भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सर्वत्र गुढीपाडवा साजरा होत असताना, कोविड सेंटरमधील रुग्ण त्यापासून वंचित राहू नयेत, अशा सूचना दिल्या. त्यानुसार कोविड सेंटरला भेट देत रुग्णांना पुरणपोळीचे जेवण देत त्यांचा आनंद द्विगुणित केला. '' 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, विजय वाजे, कैलास जाधव उपस्थित होते. 

कोल्हे यांनी कोविड सेंटरमधील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी संजीवनी उद्योगसमूहाच्या वतीने तत्काळ ऑक्‍सिजन सिलिंडर व एक ऑक्‍सिकॉन्स्ट्रेटर आणि 300 रुग्णांना पुरेल एवढा औषधांचा पुरवठा केला. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख