श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी दुभंगणार? सुत्रे राहुल जगताप यांच्या हाती

काँग्रेसला बाजूला ठेवून विखे पाटील यांना मानणारे नेते, कार्यकर्त्यांची साथ घेण्याची खेळी खेळली जात आहे. या प्रक्रियेत माजी आमदार राहुल जगताप यांच्या हाती सूत्रे, असून, स्वबळावर लढण्याच्या तयारीच्या वृत्ताला त्यांनीही दुजोरा दिला आहे.
Rahul jagtap.jpg
Rahul jagtap.jpg

श्रीगोंदे : तालुक्यात अनेक वर्षे एकत्र असणारी काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीची आघाडी आता दुंभगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली असून, संभाव्य उमेदवारांना ‘कामाला लागा’ असा छुपा आदेशही दिल्याची माहिती आहे. (In Shrigonda, the Congress-NCP alliance is on the verge of disintegration)

काँग्रेसला बाजूला ठेवून विखे पाटील यांना मानणारे नेते, कार्यकर्त्यांची साथ घेण्याची खेळी खेळली जात आहे. या प्रक्रियेत माजी आमदार राहुल जगताप यांच्या हाती सूत्रे, असून, स्वबळावर लढण्याच्या तयारीच्या वृत्ताला त्यांनीही दुजोरा दिला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढले. मात्र येथे शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी करीत राहुल जगताप यांना आमदार करण्यात वाटा उचलला. त्यावेळी प्रा. तुकाराम दरेकर यांनी या आघाडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर बहुतेक निवडणुकांत ही आघाडी एकत्रित लढली. भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव यशस्वी झाला होता.

त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकांतही दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी तीन जागा वाटून घेतल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राजेंद्र नागवडे यांनी भाजपत प्रवेश करीत तालुक्यातील काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावले. आता काँग्रेसची सूत्रे अनुराधा नागवडे यांच्या हाती आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी नागवडे यांच्यापुढे जगताप हे नमते घेत होते. आता मात्र त्यांनी नागवडे गटाला बाजूला ठेवत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून आता राष्ट्रवादी विखे पाटील गटाला मानणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांची सोबत घेणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, व बाळासाहेब गिरमकर यांची साथ घेऊन ते या निवडणुकात लढणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली असून, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा, असे आदेशही दिल्याचे समजते.

‘राष्ट्रवादी’चे संभाव्य उमेदवार
काष्टी- बंडू जगताप, वैभव पाचपुते, बाळासाहेब गिरमकर
आढळगाव- बाळासाहेब गिरमकर, हरिदास शिर्के
मांडवगण- सचिन जगताप
कोळगाव- डाॅ. प्रणोती जगताप, हेमंत नलगे (संपर्कातील एक भाजप एक नेता)
येळपणे- कल्याणी लोखंडे
बेलवंडी- अण्णासाहेब शेलार

जिल्हा परिषद स्वबळावर लढविणार

जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. तयारी सुरू असून, विरोधी पक्षातील अनेक नेतेही संपर्कात आहेत. आरक्षण कसे पडेल, याचा अंदाज घेऊन उमेदवार ठरवित आहोत.
राहुल जगताप, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com