bhaskar jadhav and thorat.jpg
bhaskar jadhav and thorat.jpg

काॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा

विधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे 12 आदार निलंबित झाले. याबाबत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कामाचे कौतुक झाले. याबाबत थोरात यांनी आज येथे बोलताना जाधवांना चिमटा काढला.

नगर : विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचे वेध लागले असतील, परंतु त्यांना ते पद मिळावे, असेे नाही. काॅग्रेसकडेही विधानसभा अध्यक्षपदावर काम करण्यासाठी सक्षम नेते आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना चिमटा काढला. (Congress also has competent leaders for the post: Bhaskar Jadhav)

विधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे 12 आदार निलंबित झाले. याबाबत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कामाचे कौतुक झाले. याबाबत थोरात यांनी आज येथे बोलताना जाधवांना चिमटा काढला.

केंद्राचा सहकार मंत्रालयाचा हेतू अनाकलनीय

‘‘सहकार चळवळ ही राज्याराज्यांत वाढलेली आहे. राज्य सरकारचे सहकारी संस्थांवर नियंत्रण असते. केंद्र सरकारने अशा स्थितीत सहकार मंत्रालय स्थापन केले. केंद्राचा सहकार मंत्रालयाचा हेतू अनाकलनीय आहे. हे मंत्रालय स्थापन केले असले, तरी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्याचा वापर केला पाहिजे,’’ असे मत थोरात यांनी व्यक्‍त केले.

इंधन दरवाढ, महागाई आणि केंद्रीय कृषी कायदे यांविरोधात कॉँग्रेस पक्षातर्फे आंदोलन केले जात आहे. मंत्री थोरात यांनी याबाबत पक्षाची भूमिका नगरला पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांवर राज्याच्या सहकार विभागाचे नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत केंद्राने सहकार खाते स्थापन कशासाठी केले, हे अनाकलनीय आहे. केंद्राच्या सहकार खात्याचा वापर सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी झाला पाहिजे. केंद्र सरकारने सहकारी बँकांवर निर्बंध आणणारे कायदे आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे संचालक मंडळांचे अधिकारच संपुष्टात येत आहेत. सहकारी संस्थांच्या स्थापनेचा हेतू साध्य झाला पाहिजे. त्यांचे अधिकार संपुष्टात येऊ नयेत.’’
थोरात म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा हा शेतकरीहिताचा नाही. सर्वसामान्यांना महागाईच्या दरीत लोटणारा आणि भांडवलशाही वाढविणारा आहे. नवीन कृषी कायद्यानुसार फक्‍त पॅन कार्डच्या आधारे कोणालाही कितीही प्रमाणात धान्य खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांशी करार किती वर्षांसाठी करायचा, याचीही तरतूद नाही. जीवनावश्‍यक वस्तूंमधून डाळी वगळण्यात आल्या आहेत. साठवणुकीला मर्यादा नाही. यातून भांडवलशाही वाढीस लागणार आहे. भांडवलदार मोठ्या प्रमाणावर धान्यांची साठवणूक करून बाजारात कृत्रिम धान्यटंचाई निर्माण करतील. यातून शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.’’

मोदींच्या बेफिकीर वृत्तीमुळेच कोरोनाची दुसरी लाट आली. देशात लाखो व्यक्‍तींचा मृत्यू झाला. या प्रतिकूल परिस्थितीमध्येही राज्यातील आघाडीने चांगले नियोजन केले. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी कोणाचा मृत्यू झाला नाही. नाशिकची दुर्घटनाही अपघाताने झाली, असे थोरात म्हणाले.

सारथी या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृह, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ‘सारथी’च्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com