कोरोनाच्या आकडेवारीत घोळ, मंत्री थोरातांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती - Confusion over Corona's figures, Minister Thorat took a swipe at officials | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

कोरोनाच्या आकडेवारीत घोळ, मंत्री थोरातांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

गाैरव साळुंके
सोमवार, 12 एप्रिल 2021

नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आढावा बैठकीला टीशर्ट घालून आले होते. या बैठकीत माहिती सादर करण्यासाठी ते उठले असता ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली.

श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असून, प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. या उपाययोजना व परिस्थितीचा आढावा काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. यामध्ये तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे संतप्त झालेल्या थोरात यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्‍यातील आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे प्रांताधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. 

बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने तालुक्‍यात सध्या 692 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे, तर तालुका आरोग्य विभागाने केवळ 458 रुग्ण असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येतील तफावत पाहून आकडेवाडीत एवढा फरक कसा काय, चुकीची माहिती का देतात? शहर परिसरात 392 कोरोनाबाधित रुग्ण असून, इतर 200 रुग्ण कुठे आहेत, असा सवाल थोरात यांनी विचारला. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे निरत्तर झाल्याने महसूलमंत्र्यांनी त्यांच्या बरोबर पालिकेचे डॉ. संकेत मुंदडा यांची कानउघाडणी या वेळी करण्यात आली. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, मागील बैठकीत तुम्हाला विशेष सूचना दिल्या होत्या. परंतु तुम्ही कोरोनाबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. त्यामुळे वाढता संसर्ग कसा रोखता येणार, बैठकीपूर्वी समन्वय साधून चर्चा करुन पुरेशी माहिती संकलन करणे आवश्‍यक आहे. बैठकीपूर्वी तुम्ही रुग्णांच्या आकडेवारीची तपासणी का केली नाही असा जाब विचारला. 

राज्याच्या निधीतून तालुक्‍यासाठी आणखी 25 खाटांची कोविड उपचार सुविधेसाठी सहकार्याची अपेक्षा आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली. नागरिकांना तपासणी अहवाल 24 तासांमध्ये मिळाला पाहिजे. चांगल्या सुविधा उभ्या करुन गरजू रुग्णांना सुविधा द्या. रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासह जेवणाची व्यवस्था करावी, खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिल्या. 

अधिकाऱ्याला टीशर्ट भोवला... 

नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आढावा बैठकीला टीशर्ट घालून आले होते. या बैठकीत माहिती सादर करण्यासाठी ते उठले असता ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची झाडाझडती घेतली. मंत्र्यांच्या दौऱ्यात अशा प्रकारे येता येते का? असा सवाल करत बैठकीतून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानंतर ते बाहेर गेले. 

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना संसर्ग पसरविणारे ठिकाणे तात्काळ बंद करा. भाजीपाला विक्रेते मास्क लावत नसेल तर कडक कारवाई करा. अत्यावश्‍यक सेवा पुरवतांना नियमांचे उल्लघंन केल्यास दुकाने बंद करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख