नगर - करमाळा रस्त्याचे भूसंपादनाबाबत खासदार विखेंनी दिले हे आदेश - Complete land acquisition of Nagar-Karmala road by August 15: MP Vikhe's order | Politics Marathi News - Sarkarnama

नगर - करमाळा रस्त्याचे भूसंपादनाबाबत खासदार विखेंनी दिले हे आदेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे  होत असून, आगामी काळात दळणवळणच्या सुविधा होत सर्वांगीण विकास साधला जाईल.

कर्जत : नगर- करमाळा (Nagar-Karmala) हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे अपघात होणार नाही, तसेच कर्जतच्या विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे  होत असून, आगामी काळात दळणवळणच्या सुविधा होत सर्वांगीण विकास साधला जाईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. (Complete land acquisition of Nagar-Karmala road by August 15: MP Vikhe's order)

कर्जत येथे नगर -करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन,कर्जत नगर आणि आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा  बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, दादासाहेब सोनमाळी, सचीन पोटरे, प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, बाबासाहेब गांगरडे, सुनील यादव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्गाचे दिवाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार डॉ. विखे म्हणले की, नगर- करमाळा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, त्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या महामार्ग भूसंपादनाचे काम रखडले असून, त्यासाठी केंद्र सरकारने अडीचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच नगर- करमाळा रस्त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा, असे अशा सूचना या वेळी डॉ. विखे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

नगर- सोलापूर मार्गावरील भू- संपादन नोटीस लवकरात लवकर काढणे व कर्जत वालवड घोगरगाव मार्गे नगर रस्त्याच्या कामात दिरंगाई बद्दल वेळप्रसंगी संबंधित ठेकेदार फौजदारी कारवाई करण्याबाबत झालेल्या मागणीवर एकमत झाले. तसेच आढळगाव जामखेड रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन डॉ. विखे पाटील यांनी दिले.

महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत 8 कोटीचा अतिरिक्त निधी महामार्ग दुरुस्ती करिता आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केले असल्याचे डाॅ. विखे पाटील यांनी सांगितले .
 

हेही वाचा...

खासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख