तक्रारींचा पाऊस पडला अन मंत्री थोरातांनी अधिकारी घेतले फैलावर !

पाथर्डीत कोरोना बाधीतांची होणारी हेळसांड, लसीकरणाला लागणाऱ्या रांगा, ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हीरचा तुटवडा याबाबत बहुतेक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. परिस्थिती गंभीर आहे.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

पाथर्डी : शहरासह तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला उपस्थिती लावत तक्रारांची पाऊस पाडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यसह महसूल प्रशासनाची कानउघाडणी केली. 

या आढावा बैठकीला आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, डॉ.भगवान दराडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, राहुल राजळे, गोकुळ दौंड, देविदास खेडकर, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, नासीर शेख, किशोर डांगे, सुभाष केकाण आदी उपस्थित होते. 

पाथर्डीत कोरोना बाधीतांची होणारी हेळसांड, लसीकरणाला लागणाऱ्या रांगा, ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हीरचा तुटवडा याबाबत बहुतेक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. परिस्थिती गंभीर आहे. आहे त्या मनुष्यळामध्ये कोरोनाचे संकट परतावयाचे आहे. काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. कोरोना होऊ, नये याचीच काळजी घ्यावी. राष्ट्रवादीचे बंडू बोरुडे, शिवशंकर राजळे, चंद्रकांत मरकड, योगेश रासणे यांनी महसूलमंत्र्यांना सुमन ढाकणे प्रतिष्ठाणतर्फे सुरु केलेल्या कोवीड सेंटरला भेट द्यावी. तालुक्‍यात कोरोनाच्या परिस्थितीत येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी सोडवाव्यात, या मागणीचे निवेदन दिले. 

समन्वयाने काम करणे आवश्यक

सर्वांनी केलेल्या सूचनांचा आदर करून कोरोनाशी लढताना अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी समनव्याने काम करणे गरजेचे आहे, असे थोरात यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा...

माणूसकीचा धर्म जागवण्याची हीच योग्य वेळ : ऍड. काकडे 

अमरापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करुन त्यांची सेवा करण्याची व त्यातून माणूसकीचा धर्म जागवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बाधीत रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण संस्थेच्या इमारती खुल्या करुन देवू, असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक ऍड. शिवाजी काकडे यांनी केले. 

आबासाहेब काकडे शैक्षणिक व औद्योगिक समूहातर्फे जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या प्रयत्नातून अमरापूर येथील विद्यालयात जनशक्ती कोविड सेंटर सुरु करण्यात आले. या सेंटरचा शुभारंभ बुधवार (ता. 21) ऍड. शिवाजी काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

अमरापूरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, सुरेश चौधरी, जनशक्तीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, राजेंद्र पोटफोडे, म्हातरदेव आव्हाड, शिवाजी औटी, रज्जाक शेख, भारत भालेराव, शिवाजी कणसे, अशोक दातीर, विष्णू दिवटे उपस्थित होते. 
रुग्णांसाठी येथे चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था मोफत केली आहे. येथील कोविड सेंटरमधील रुग्णांवर डॉ. श्वेता फलके व डॉ. अरविंद पोटफोडे हे उपचार करणार असून कोरोनाबाधीत रुग्णांसाठी 50 बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

Edited By  - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com