सामान्य व्यक्ती हेच माझे कुटुंब : नागवडे - The common man is my family: Nagwade | Politics Marathi News - Sarkarnama

सामान्य व्यक्ती हेच माझे कुटुंब : नागवडे

संजय आ. काटे
शुक्रवार, 14 मे 2021

नागवडे यांनी आज वाढदिवसानिमित्त शहरातील व तालुक्‍यातील सर्व कोविड सेंटरला औषधे, वैद्यकीय साधनसामग्री व खाद्यपदार्थ देत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

श्रीगोंदे : साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे आशीर्वाद व संस्कार बरोबर घेऊन आम्ही सामाजिक काम करीत आहोत. सामान्य जनता हेच माझे कुटुंब असल्याचे "नागवडे साखर कारखान्या'चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagawde) यांनी सांगितले. (The common man is my family: Nagwade)

नागवडे यांनी आज (ता. 14) वाढदिवसानिमित्त शहरातील व तालुक्‍यातील सर्व कोविड सेंटरला औषधे, वैद्यकीय साधनसामग्री व खाद्यपदार्थ देत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सहा दशके नागवडे कुटुंब सामाजिक व विधायक कामात अग्रेसर आहेत. संकटकाळात सामान्य जनतेबरोबर खंबीरपणे राहण्याची शिकवण कायम स्मरणात ठेवू, अशी ग्वाही नागवडे यांनी दिली. 

हेही वाचा..

कोरोना कमी होतोय

अकराशे कोविड रुग्णांसाठी औषधांचे संच, सॅनिटायझर, मास्क त्याचबरोबर खाद्यपदार्थ देण्यात आले. तहसीलदार प्रदीपकुमार पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांचा कोरोना काळातील उत्तम सेवेबद्दल गौरव केला. बाबासाहेब भोस, अनुराधा नागवडे, शुभांगी पोटे, मनोहर पोटे उपस्थित होते.

 

हेही वाचा...

राहुरीत शिस्तबद्धपणे लसीकरण सुरू 

राहुरी : आदल्या दिवशी सायंकाळी सोशल मीडियातून यादी जाहीर होते. राहुरी पालिकेतून निरोपाचा फोन येतो, लसीकरणाची वेळ निश्‍चिती होते,

अनावश्‍यक गर्दीही नसते. लसीकरण केंद्रावर मंडपात खुर्च्या मांडलेल्या असतात. सोशल डिस्टन्सींग ठेवून बसायचे नंबर आला, की नोंदणी करून लस घ्यायची आणि अवघ्या दहा-पंधरा मिनिटात बाहेर पडायचे, असे शिस्तबद्ध कोरोना लसीकरण राहुरीत सुरू आहे. 

डोस सत्तर, गर्दी सातशेंची, सोशल डिस्टंसंगीचा फज्जा, गर्दीतील कोरोना पॉझिटिव्ह इतरांना कोरोना विषाणूचा प्रसाद वाटतात, असे चित्र आता बदलले आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून राहुरीत सुरू झालेले शिस्तबद्ध लसीकरणाचे नियोजन आदर्श ठरले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन, राहुरी सारखी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाभरात दिले. त्यामुळे, राहुरी सारखे नियोजन केलेल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रातही शिस्तबद्धता आली आहे. आज राहुरी शहरातील भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेत लसीकरण प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव, गजानन सातभाई, सर्जेराव तनपुरे उपस्थित होते. एका तासात चाळीस जणांचे लसीकरण प्रक्रिया होते. आज सत्तर जणांच्या दुसऱ्या डोसचे दोन तासात लसीकरण झाले. अगोदर रॅपिड ऍन्टीजेन चाचणी, नंतर लसीकरण झाले. कोरोना पसरण्याची भिती नाही. जलद, विनम्र, सुरक्षित लसीकरणामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख