नगरमध्ये सात ऑक्‍सिजन प्लॅंटना कार्यारंभ आदेश, दोन महिन्यांत मुबलक साठा

हे प्रकल्प 50 बाय 50, अशा 2500 हजार चौरस फूट जागेवर साकारले जाणार आहेत. याकरिता जागांची निश्‍चिती झाल्याचे समजते.
Oxijan.jpg
Oxijan.jpg

जामखेड : ऑक्‍सिजनच्या तुटवड्याने हैराण झालेल्या नगर (Nagar) जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात (Nagar) आता नव्याने सात जम्बो ऑक्‍सिजन प्लॅंट उभे राहणार आहेत. याकरिता कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. अवघ्या पंचेचाळीस दिवसांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे संबंधित एजन्सींना बंधनकारक करण्यात आले आहे.  (Commencement order for seven oxygen plants in the town, abundant reserves in two months)

जिल्ह्यातील ऑक्‍सिजन प्लॅंटसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत जिल्ह्यात मुबलक ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. 

जिल्ह्यात पूर्वी पाच ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू होते. नव्याने संगमनेर व कोपरगावमधील साखर कारखाने, तसेच विळद घाटात खासदार डॉ. सुजय विखेंच्या पुढाकाराने ऑक्‍सिजन प्लॅंट उभे राहत आहेत. साईसंस्थानच्या माध्यमातून ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू आहे. त्यातच नव्याने शासकीय स्तरावरून सात ऑक्‍सिजन प्लॅंटचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पॅंराडे एजन्सीला कर्जत, पाथर्डी व संगमनेर येथे, ऑक्‍सर एजन्सीला नगर, श्रीगोंदे, तर फायरवेल एजन्सीला श्रीरामपूर, अकोले येथे प्लॅंटसाठी परवानगी मिळाली आहे. 

हेही वाचा.

हे प्रकल्प 50 बाय 50, अशा 2500 हजार चौरस फूट जागेवर साकारले जाणार आहेत. याकरिता जागांची निश्‍चिती झाल्याचे समजते. एक प्रकल्प उभारण्यासाठी सरासरी सव्वादोन कोटी, असा एकूण पंधरा कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च येणार आहे.

पंचेचाळीस दिवसात शेड व इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत. प्लॅंटसाठी लागणारे काही सुटे भाग परदेशातून आणले जाणार आहेत. प्रत्यक्षात जूनपासून जिल्ह्यातील नागरिकांना या प्रकल्पातून प्रतिदिन सात हजार लिटर क्षमतेचे ऑक्‍सिजनचे अडीचशे जम्बो सिलिंडर मिळणार आहेत. प्लॅंट सुरू झाल्यापासून वर्षभरापर्यंत देखभाल- दुरुस्तीचे काम संबंधित एजन्सीकडेच असणार आहे. नंतर वार्षिक देखभालीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून निश्‍चित केली जाणार आहे. 

राज्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकारी साखर कारखानदारांना ऑक्‍सिजन प्लॅंट उभे करण्याची साद घातली, तर त्यांचे नातू आमदार रोहित पवारांनी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकीत जिल्हा प्रशासनाला ऑक्‍सिजन प्रकल्प उभारणीचा निर्णय घ्यायला लावून गळ घातली. त्यामुळे नगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर मुबलक प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध होईल, हे मात्र नक्की! 

जागेची अडचण सुटली

"कर्जत, पाथर्डी व संगमनेर येथील जागेची अडचण सुटली आहे. सिव्हिल वर्क सुरू करीत आहोत. पंचेचाळीस दिवसांत प्लॅंटचे काम पूर्ण करणार आहोत. जूनपासून ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू होतील. 
- डॉ. तिरुपती ताटेवार, तांत्रिक अधिकारी, पॅंराडे एजन्सी, कोइमतूर 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com