समाजमाध्यमाने सत्तेच्या दबावाखाली येणे कमीपणाचे : बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून आपलेही ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले असून, ही लोकशाही व विचारस्वातंत्र्याची गळचेपी आहे.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : ट्विटर या आंतरराष्ट्रीय समाजमाध्यमावर प्रत्येक जण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य असते, फक्त ते देशाच्या विरोधात नसावे, ही अपेक्षा असते. समाजहिताच्या बाबी मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिला आहे. खासदार राहुल गांधी व आम्हीदेखील तेच करीत होतो. त्यांच्यानंतर आज काँग्रेसचे अधिकृत खाते ब्लॉक करण्यात आले. (Coming under the pressure of power through social media is less: Balasaheb Thorat)

राहुल गांधी यांचे समर्थन केल्याच्या कारणावरून आपलेही ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले असून, ही लोकशाही व विचारस्वातंत्र्याची गळचेपी असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हेही वाचा..

थोरात म्हणाले, की खरे तर ट्विटर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मान्यताप्राप्त संस्था आहे. अशा संस्थेने एखाद्या पक्षाच्या, म्हणजेच भाजपच्या किंवा सत्तेच्या दबावाखाली येणे हे त्यांच्यासाठी कमीपणाचे आहे. भारतात विचारस्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे, हे दाखवून देणारे हे उत्तम उदाहरण आहे. ट्विटर त्यासाठी कारणीभूत आहेच, पण त्यापेक्षाही अधिक जबाबदार भाजप आणि केंद्र सरकार असल्याचा आरोपही मंत्री थोरात यांनी केला. दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खुनाच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड झाल्याबद्दल भाजपसह इतरांनी केलेल्या तक्रारींमुळे ट्विटरने प्रथम राहुल गांधी व काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बंदी आणली. नंतर राहुल गांधींना समर्थन देणारे राज्यातील काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाउंट ब्लॉक केले. भाजपकडून लोकशाहीवर आघात होत असल्याचे सांगत थोरात यांनी जनतेच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी केंद्र सरकार व भाजप जबाबदार असल्याचा घणाघात केला आहे.

हेही वाचा..

बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आंदोलन

नेवासे फाटा : राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीस परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज (ता. ११) नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात नेवासे तालुका बैलगाडा संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बैल आणल्याने एकच गोंधळ उडाला. नायब तहसीलदार संजय परदेशी यांनी निवेदन स्वीकारले. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत दाते व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनात अंबादास कोरडे, बबनदादा लंघे, स्वप्नील बोधक, सचिन काळे, संदीप कर्डिले, गणेश झगरे, तेजस कर्डिले, पापा शेख, गणेश पाटील, दादासाहेब नाबदे, दौलत गणगे, राजू निकम, संपत नवथर, प्रकाश शिंदे, दादा सरोदे, बाळासाहेब साळवे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com