नगरकरांना दिलासा, कोरोनाची घसरतेय आकडेवारी

जिल्ह्यात दिवसभरात ७७१ बाधित आढळून आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत २१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ व अँटिजेन चाचणीत ३४३ जण बाधित आढळले.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

नगर : जिल्ह्यात (Nagar) दिवसभरात १५५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढला असून, तो ९५.८३ टक्के झाला आहे. (Comfort to the townspeople, Corona's declining figures)

जिल्ह्यात दिवसभरात ७७१ बाधित आढळून आले. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत २१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ व अँटिजेन चाचणीत ३४३ जण बाधित आढळले.

जिल्ह्यात आजअखेर दोन लाख ६६ हजार २४२ रुग्ण आढळून आले. त्यांतील दोन लाख ५५ हजार १४५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सात हजार ७१२ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आजअखेरपर्यंत तीन हजार ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढला असला, तरी मृत्यूचा प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. आज दिवसभरात एकूण २९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आकडा कमी करण्यासाठी आता आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने प्रशासनाने आता लसीकरणाचा वेग वाढविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेपासून जिल्हा वाचेलच; पण कोरोनामुक्तीही लवकर शक्य होऊ शकेल, असा विश्‍वास नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरची चर्चा महाराष्ट्रभर सुरू होती.

दरम्यान, राहाता तालुक्यातील चितळी येथे गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण सापडला नाही. त्यामुळे हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. पाच हजार लोकसंख्येच्या चितळी गावावर दोन महिन्यांपूर्वी कोविडने जीवघेणा हल्ला चढवला. त्यात एकापाठोपाठ एक पन्नासहून अधिक ग्रामस्थांचे बळी गेले. सरकारी यंत्रणेने ग्रामस्थांना सोबत घेऊन निकराची झुंज दिली. मात्र, जीवितहानी मोठी झाली. सरकारी नोंदींनुसार बाधितांची संख्या सहाशेच्या वर गेली होती. घरीच औषधोपचार करून किती बरे झाले, याची तर गणतीच नव्हती. आता गावातील अनेक कुटुंबांत विध्वंसाच्या खुणा मागे ठेवत कोविडने येथून काढता पाय घेतलाय. गेल्या आठ दिवसांपासून येथे एकही बाधित रुग्ण आढळला नाही.

एप्रिल महिन्यात या गावात कोविडने अक्षरशः उच्छाद मांडला. दीड महिन्यात ६९ मृत्यू झाले. त्यांतील ५१ कोरोनामुळे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. एवढी मोठी जीवितहानी नगर जिल्ह्यात क्वचितच एखाद्या गावात झाली असेल. हे गाव राहाता तालुक्यात, विधानसभा मतदारसंघ कोपरगाव व पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र श्रीरामपूर आहे. मुळे ग्रामस्थांना एरवीही अनेक अडचणी येतात. कोविडने या गावावर चढविलेला हल्ला एवढा जबरदस्त होता, की त्यामुळे सुरू झालेली मृत्यूची मालिका थांबता थांबेना. पंधरा दिवसांपूर्वी दोन तरुणांचे बळी गेले. त्यानंतर मात्र परिस्थिती सुधारली आहे. सध्या येथील केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com