मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ
Chitra wagh.jpg

मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ

इडी व सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. भाजप या संस्थांचा वापर करत नाही. जेथे गैरव्यवहार आढळून येतो, त्याच ठिकाणी या संस्था छापे टाकत आहेत.

नगर : मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी स्वतः वाहन चालविले. त्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीष महाजन आणि निरंजन डावखरे हे कोकाणात पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जातात. हे राज्यातील जनतेच्या प्रश्‍नांचे गांभीर्य नसल्याचे लक्ष आहे, अशी टीका भाजप महिला राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की इडी व सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. भाजप या संस्थांचा वापर करत नाही. जेथे गैरव्यवहार आढळून येतो, त्याच ठिकाणी या संस्था छापे टाकत आहेत. राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भारतीय पोलिस प्रशासकीय सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने गृहमंत्र्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. या चौकशीत तथ्य आढळून काही व्यक्‍तींवर कारवाई ही झाली आहे.

हे सरकार गैरव्यवहार, महिला अत्याचाराची प्रकरणे दडपत आहेत. एका प्रकरणात आपल्याला जनहित याचिका दाखल करावी लागली. या याचिकेच्या दोन सुनावण्या झाल्या आहेत. आपला न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. या प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

राज कुंद्रा यांचे प्रकरण ही गंभीर आहे. सध्या या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. योग्य वेळ आल्यास आपण या विषयावर बोलू असे सांगितले.

हेही वाचा..

लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा

टाकळी ढोकेश्वर : जिह्यातील पारनेर तालुक्यासह सर्वच लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा, नोंदणीचा गोंधळ ठरलेला आहे. याबाबत ठोस धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. मात्र, यावर कोणीही राजकीय नेते किंवा सरकारी अधिकारी बोलताना दिसत नाही.

सरकारी रूग्णालयावर ही लस मोफत दिली जात आहे. खासगी रूग्णालयात मात्र, याचे भाव सामन्यांना न परवडणारे आहेत. कोविडशीड ७८०, कोवॅक्सीन १४१० रूपयांना विकत घ्यावी लागत आहे. नागरिक ऑनलाईन नोंदणीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ऑनलाईन नोंदणी न केल्याने नागरिक पहाटेपासुनच रूग्णालयात रांगा लावत आहेत. त्यानंतरही नाव नोंदणी, टोकण त्यानंतर काही केंद्रावर रॅपिड टेस्ट करावी लागत आहे. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा पूर्ण दिवस जात आहे. मात्र, जे नागरिक आजही ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना या त्रासातून जावे लागत नाही.

ग्रामीण भागात ऑनलाईनचा पर्याय नागरिक वापरत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनाही नोंदणी करताना अडचणी येतात. ऑनलाईनच पर्याय ठेवला तर हा गोंधळ होणार नाही आजही राजकीय नेते किंवा अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. ढोसांची संख्या येते कमी प्रमाणात आणि नागरिकांची रुग्णालयासमोर लांबच लांब रांग.
 

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in