शिर्डीत जॅम्बो कोविड सेंचटरला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : खासदार सदाशिव लोखंडे - CM gives green light to Jambo Kovid Center in Shirdi: MP Sadashiv Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीत जॅम्बो कोविड सेंचटरला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : खासदार सदाशिव लोखंडे

सतीश वैजापूरकर
शनिवार, 8 मे 2021

दोन हजार ऑक्‍सिजन बेड व दोनशे खाटांच्या अतिदक्षता विभागाची सुविधा त्यात असेल. खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

शिर्डी : साईसंस्थानच्या मदत घेऊन शिर्डीत तब्बल चार हजार दोनशे खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन हजार ऑक्‍सिजन बेड व दोनशे खाटांच्या अतिदक्षता विभागाची सुविधा त्यात असेल. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर येथे येऊन पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. (CM gives green light to Jambo Kovid Center in Shirdi: MP Sadashiv Lokhande)

खासदार लोखंडे म्हणाले की, विधी व न्याय विभागाने त्यासाठी आवश्‍यक असलेले मंजुरीचे पत्र साईसंस्थानला धाडले आहे. तदर्थ समितीची मान्यता व उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी तसेच ज्या बाबींसाठी सरकारी मान्यता आहे. या बाबी लक्षात घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री प्राजक्त तनपुरे व शंकरराव गडाख या सर्वांना सोबत घेऊन आपण ही नियोजित जम्बो कोविड सेंटरची उभारणी पूर्णत्वास नेऊ. त्यासाठी हवेतून ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅट उभारले जातील. मुंबईतील जम्बो कोविड सेंटर चालविण्याचे काम ज्या अनुभवी संस्थांना देण्यात आले. त्यांना येथील हे कोविड सेंटर चालविण्याची जबाबदारी देता येईल. 

हेही वाचा...

जामखेडमध्ये जनता कर्फ्यू

आपण याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा आधार घेऊन मंत्री छगन भुजबळ व मंत्री दादा भुसे यांनी हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. त्यास बऱ्याच मंत्र्यांनी अनुमती दर्शविली. नगर जिल्ह्यासह नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्‍यातील रूग्णांसाठी हे जम्बो कोविड सेंटर मोठा आधार ठरेल. आज आपण साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या समावेत बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राहूल गोंदकर आदी उपस्थित होते. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख