मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, लवकरच लाॅकडाऊनची घोषणा : बाळासाहेब थोरात

लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, तथापि, जीवनावश्यक वस्तुंची तयारी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत चर्चा केली आहे. सर्वांची मते घेतली आहेत. लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही. आपल्याला सामोरे जावे लागेल. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री घोषणा करतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, की लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, तथापि, जीवनावश्यक वस्तुंची तयारी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

संगमनेरबाबत बोलताना ते म्हणाले, की इतर जिल्ह्यांप्रमाणेच नगरमध्येही परिस्थिती तशीच आहे. परंतु यंत्रणा काम करीत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही कामात कसूर केली जात नाही.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांबाबत बोलताना थोरात म्हणाले, की कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी फडणवीस तसे बोलतात, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले असून, ही राष्ट्रीय आपत्ती आहे. देशाची आकडेवारी पाहता याची राष्ट्रीय पातळीवर विचार होण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आमची केंद्राकडून अपेक्षा आहे, आम्ही देखील काम करतच आहोत. जेवढे शक्य आहे, तेवढे काम राज्य सरकार करीत आहेत, असे या पत्रात म्हटले असल्याचे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा...

राहाता शहराची अशीही ओळख

राहाता : कोविडचा हाॅटस्पाॅट म्हणून राहाता शहराची ओळख निर्माण झाली. संसर्ग वेगाने फैलावत असल्याने शहरातील ग्रामीण रूग्णालयात कोविड चाचण्यांसाठी गर्दी वाढली.

दररोज दोनशेहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. तरीही गर्दी कमी होत नाही. रूग्णालयाच्या आवारात सावली नसल्याने कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आज पालिकेने तेथे तातडीने मोठा मंडप उभारला. 

याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष ममता पिपाडा म्हणाल्या, की कोविड प्रकोपामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या गर्दीत भर पडली. कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पालिकेने मंडप उभारावा अशी मागणी केली जात होती.

आज तेथे दोन मोठे मंडप उभारण्यात आले. पिण्याच्या पाण्याची व बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कोविड चाचणीसाठी येणाऱ्या शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. शहरातील अन्य सरकारी कार्यालये व बॅंकाच्या आवारात जेथे उन्हाचा त्रास होते, अशा ठिकाणी मंडप उभारण्याबाबत सबंधितांना पालिकेच्या वतीने लेखी सुचना दिल्या जातील. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास पालिकेच्या वतीने तेथे सावलीसाठी मंडप उभे केले जातील.

Edited By- Murlidhar karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com