नगरला रात्री उशिरा मिळाला आॅक्सिजन, अद्यापही 31 मेट्रीक टनाची गरज - The city received oxygen late at night, still needing 31 metric tons | Politics Marathi News - Sarkarnama

नगरला रात्री उशिरा मिळाला आॅक्सिजन, अद्यापही 31 मेट्रीक टनाची गरज

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

खासगी रुग्णालयात केवळ तीन-चार तास पुरेल एव्हढाच आॅक्सिजन साठा असल्याने संबंधित डाॅक्टरांनी सांगून जिल्हा प्रशासनाला याबाबत खळविले.

नगर : काल (मंगळवारी) जिल्ह्यातील बहुतेक रुग्णालयातील आॅक्सिजन संपला होता. काल दुपारी काही रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाला व रुग्णांच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना दिल्यानंतर गोंधळ उडाला. रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रात्री उशिरा आॅक्सिजन देण्यात प्रशासन यशस्वी झाले. तोपर्यंत जीवन-मृत्यूच्या खेळात अनेक रुग्णांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्याला अद्यापही 31 मेट्रीक टन आॅक्सिजनचा तुटवडा आहे.

खासगी रुग्णालयात केवळ तीन-चार तास पुरेल एव्हढाच आॅक्सिजन साठा असल्याने संबंधित डाॅक्टरांनी सांगून जिल्हा प्रशासनाला याबाबत खळविले. आॅक्सिजन मिळाला नाही, तर अनेक रुग्णांचा मृत्यू होणार, हे अटळ होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. काल दिवसभर मंत्री, आमदार, अधिकारी यांची तारांबळ उडाली. आॅक्सिजन कुठून उपलब्ध करायचा, हा मोठा प्रश्न होता. अखेर जिल्हा प्रशासनाने 29 मेट्रीक टन आॅक्सिजन उपलब्ध करून घेतला. आॅक्सिजन घेऊन येणारे वाहन शिक्रापूर येथे अडविण्यात आले असल्याने त्याला नगरला येण्यास उशिर झाल्याचे सांगितले जाते. 

सध्या नगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयांत 45 मेट्रीक टन आणि शासकीय जिल्हा रुग्णालयात 15 मेट्रीक टन असा एकूम 60 मेट्रीक टन आॅक्सिजनची मागणी आहे. त्यापैकी केवळ 29 मेट्रीक टन आॅक्सिजन साठा शिल्लक असून, ही परिस्थीती उद्यापासून (ता. 22) सुधारू शकेल, असे सांगण्यात आले. म्हणजे अद्यापही 31 मेट्रीक टन आॅक्सिजनचा साठा कमी असल्याचे दिसून येत आहे.

 

हेही वाचा..

औदयोगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकिय कारणासाठी उपलब्ध होणार

संगमनेर : कोविडच्या दुसऱ्या साथीत राज्याच्या आरोग्यक्षेत्रात आणीबाणीसदृष्य वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरातही अत्यवस्थ रुग्णांना बेड उपलब्ध न झाल्याने खळबळ उडाली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्नही ऐरणीवर आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी लागणाऱ्या प्राणवायूचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने आरोग्य यंत्रणा गॅसवर असल्यासारखी परिस्थिती आहे.

या पार्श्वभुमिवर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथील वैद्यकिय वापरासाठी असलेल्या ऑक्सिजन रिफीलींग सेंटरमधील ऑक्सिजन वैद्यकिय वापरासाठी उपलब्ध होणार असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

संगमनेरातील खासगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांची संख्या भरपूर आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजनयुक्त बेडची मागणी वाढत आहे. या पार्श्वभुमिवर निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले लोहारे येथील औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन सिलींडर पुरवणाऱ्या केंद्रातून वैद्यकिय वापरासाठीच्या ऑक्सिजनसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन, तातडीची परवानगी पेसो संस्थेकडून मिळवली आहे. त्यामुळे शासकिय व खासगी रुग्णालयांना दररोज सुमारे 700 ऑक्सिजन सिलींडर उपलब्ध होणार आहेत.

संगमनेरमध्ये कोरोना आढावा बैठकीत ऑक्सीजन पुरवठादार राम जाजू यांना बोलावून या कामी सूचना दिल्या होत्या. तसेच अहमदनगर शहरातही तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. 

थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी लोहारे मीरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट देवून पहाणी केली. यावेळी या केंद्राचे संचालक भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे आदी उपस्थित होते.
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख