देशमुख यांच्यावरील सीबाआयच्या गुन्ह्याला राजकीय वास : थोरातांचा आरोप - CBI's case against Deshmukh has political implications: Thorat's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुख यांच्यावरील सीबाआयच्या गुन्ह्याला राजकीय वास : थोरातांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

देशात कोविडमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ऑक्‍सिजनचा पुरवठा करणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या प्रमाणात ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

संगमनेर : माजी गृहमंत्री यांच्यावर झालेल्या 100 कोटींच्या आरोपांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला. वास्तविक या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नेमला होता. मात्र त्यापूर्वीच घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाला खऱ्या अर्थाने राजकारणाचा वास असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

कोल्हार घोटी राज्यमार्गावरील विघ्नहर्ता लॉन्स मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पाचशे बेडच्या कोवीड केअर सेंटरची पहाणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

थोरात म्हणाले की, कोरोनाची कमी तीव्रता व लक्षणे असलेले रुग्ण तातडीचे उपचार मिळाल्यास बरे होऊन घरी जाऊ शकतात. संगमनेर शहर व तालुक्‍यात घरोघरी सर्वेक्षण सुरु केले आहे. संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणार आहोत. या निर्णयाचा चांगला परिणाम शनिवार (ता. 24) ला समोर आला आहे. संगमनेर शहरात केवळ 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांना बाहेर काढल्यास संसर्ग थांबवण्यात यश आले आहे. देशात कोविडमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ऑक्‍सिजनचा पुरवठा करणे कठीण झाले आहे. रुग्णांच्या प्रमाणात ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लॉकडाउनचा निर्णय नागरिकांनी चांगल्या पध्दतीने पाळल्यास रुग्णाला ऑक्‍सिजनची गरजच पडणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. 

थोरात म्हणाले की, कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा मोफत लस द्यावी, यासाठी आग्रही आहेत. कॉंग्रेसपक्ष व राज्य शासनाचा तोच प्रयत्न आहे. यावर चर्चा होईल. मात्र निर्णय जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आहे. 

 

हेही वाचा..

रेमडेसिव्हिरसाठी युवतीचे महसूलमंत्र्यांना साकडे 

नगर : कोरोनाचा कहर राज्यात वाढत असताना रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या मैत्रीणीच्या आईला रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनची गरज असून ते मिळत नसल्याने तरुणीने थेट महसूलमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. तरुणीच्या मागणीची दखल घेत त्यांनी इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 

जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची कन्या मानसीने गायकवाड हिने ही मागणी केली. कोरोना काळात ठाण्यात एकट्या पडलेला सिंगल चाईल्ड मदरला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी तिने नगरमध्ये महसूल मंत्र्यांचा वेळ घेतला. 

पुण्याच्या सिमबायोसिस कॉलेजमध्ये आर्किटेकटच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या मानसीच्या वर्ग मैत्रिण रिधिमा हिची आई ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या मैत्रिणीच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे रिधिमाने आपली नगरमधील मैत्रिणीशी संपर्क साधला व मदतीची याचना केली होती. त्यानंतर मानसीने महसूलमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यामुळे तात्काळ इंजेक्‍शन उपलब्ध झालेले आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख