भाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी
Chitra wagh 2.jpg

भाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र अतिवृष्टीने शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. राज्यावर आपत्ती असताना मुख्यमंत्री तिकडे जात नाहीत.

नगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात असले, तरी त्यांच्याबद्दल मनात कायम गुरूचे स्थान राहणार आहे, असे मत भाजपच्या महिला राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणत्या कारणांमुळे सोडला, हे मात्र सांगण्याचे त्यांनी टाळले. (BJP's Chitra Wagh says, Sharad Pawar is in my Gurusthan as long as I am alive)

नगर जिल्ह्यातील अत्याचारीत पीडित सहा कुटुंबांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

वाघ म्हणाल्या की, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र अतिवृष्टीने शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. राज्यावर आपत्ती असताना मुख्यमंत्री तिकडे जात नाहीत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीष महाजन, निरंजन डावखरे अगोदर पुरग्रस्तांच्या मदतीला जातात. त्यानंतर मुख्यमंत्री जातात. हे जनतेकडे दुर्लक्ष असल्याचे लक्ष आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे संकटात जिल्हा असताना मुंबईला पळून येतात. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाताना ड्रायव्हिंग केले, त्यांच्या त्या कौशल्याची आता कोकणात गरज आहे.

कोरोना संकट काळात मुख्यमंत्री मातोश्री व वर्षा या दोनच निवासस्थानी राहतात. ते मंत्रालयात आले म्हणजे बातमी होते. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी यायचे असते. परंतु, त्यांना कोरोनात फक्‍त स्वतःची व कुटुंबाची काळजी आहे.

खासदार संजय राऊत हे प्रत्येक प्रश्‍नांच्या वेळेस केंद्राकडे मदतीची अपेक्षा करतात. केंद्र सरकार तर मदत करणार आहे. परंतु, राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी नाही का? राज्याने मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण रक्कम अद्याप दिलेली नाही.
 

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in