भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे पंकजा मुंडेंकडून नामंजूर

छतचं अंगावर पडले व येथे काही राम राहिला नाही, असे वाटले तर मग निर्णय घेवू. मला कोणाला संपवुन राजकारण करायचे नाही. तुमचे राजीनामे मी नामंजूर करते.
Pankaja Munde.jpg
Pankaja Munde.jpg

पाथर्डी : मला सत्तेची लालसा नाही. मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) तुम्हाला राजीनामे द्यायला लावेल का? माझा आजावरचा प्रवास खडतर होता. पुढचाही खडतरच दिसतोय, मात्र अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. भाजपा हे आपले घर आहे. ते का सोडायचे ? छतचं अंगावर पडले व येथे काही राम राहिला नाही, असे वाटले तर मग निर्णय घेवू. मला कोणाला संपवुन राजकारण करायचे नाही. तुमचे राजीनामे मी नामंजूर करते, अशा शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समर्थकासमोर भुमिका मांडली. (BJP workers' resignations rejected by Pankaja Munde)

वरळी येथे राज्यभरातून आलेल्या भारतीय जनता पक्ष व मुंडे समर्थक कार्यकर्त्यांशी मंगळवारी पंकजा मुंडे यांनी सवांद साधला. बीड, औंरगाबाद, नगर, जालना, बुलढाणा  येथुन समर्थक मुंबईत दाखल झाले होते. या वेळी बोलताना मुंडे म्ह्णाल्या, की मला व बहिनीला मंत्री करण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. गोपिनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक माझं कुंटुब आहे. ते कुटुंब सांभाळायची जबाबदारी मी स्विकारलेली आहे. मला सत्तेची लालसा नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा व जे पी नड्डा माझे नेते आहेत. माझा आजवरचा प्रवास खडतर होता. पुढचा आणखी खडतर दिसतोय ? पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. भाजपा आपले घर आहे. स्वर्गीय कोपिनाथ मुंडे यांनी ते मोठ्या कष्टाने उभे केले आहे, ते का सोडायचे. जेव्हा छतच अंगावर कोसळेल व येथे राम राहिला नाही, असे वाटेल तेव्हा निर्णय घेवू, असा इशाराही मुंडे यांनी या वेळी दिला आहे.

मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात येत असल्याचे मुंडे म्हणाल्या. भागवत कराड हे ज्येष्ठ असून, मी त्यांचा अपमान का करु? मला सर्व समजते. मी कोणाचा अपमान करणार नाही.

या वेळी मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. या वेळी अरुण मुंडे, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, माणिक खेडकर, धनंजय बडे, संजय किर्तने, गणेश कराड यांच्यासह समर्थक उपस्थीत होते.  
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com