Babanrao pachpure.jpg
Babanrao pachpure.jpg

मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार : आमदार पाचपुते 

आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केली

श्रीगोंदे : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली. आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे दिली. (BJP workers to participate in Maratha reservation movement: MLA Pachpute)

पाचपुते म्हणाले, की आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केली.

फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचादेखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील, त्यामध्ये भाजपा पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे. 

मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपचा सक्रीय सहभाग राहील, असे ते म्हणाले. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे, असा आरोपही पाचपुते यांनी आहे. 

हेही वाचा..

शासनाने दुधाची खरेदी करावी ः राजेश परजणे 

कोपरगाव : राज्यात केलेल्या "लॉकडाउन'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे. दूधव्यावसायिक व संस्था वाचविण्यासाठी शासनाने शंभर टक्के दूध खरेदी करून 30 रुपये दर द्यावा, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात परजणे यांनी म्हटले आहे, की "लॉकडाउन'पूर्वी दुधाचा 30 ते 31 रुपये प्रतिलिटर असलेला दर आता 24 ते 25 रुपयांवर आला आहे. कोरोना महामारीत जनावरांची औषधे, पशुखाद्य, चारा यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. "लॉकडाउन'च्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री घटली. अशीच परिस्थिती 31 मेपर्यंत राहिली, तर शेतकऱ्यांना दूध रस्त्यांवर ओतून देण्याची वेळ येईल. त्यामुळे दुग्धव्यवसाय अडचणीत सापडेल. 

संघांचे दूध शासन पूर्ण क्षमतेने खरेदी करीत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भविष्यात दूधखरेदी बंद ठेवण्याची वेळ आली, तर दूधउत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील. यापूर्वीही निवेदन पाठवून या अडचणी मांडल्या होत्या; परंतु त्यावर अद्याप शासन पातळीवर विचार झालेला नाही. दूधव्यवसायातील या गंभीर प्रश्‍नांची आता तरी तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com